Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केकेआऱने घेतल्यामुळे राजस्थानचे सलामीवीर प्रथम मैदानात आले. दरम्यान राजस्थानचे सलामीवीर देवदत्त आणि बटलर दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्यांना लवकर बाद करणं केकेआरसाठी महत्त्वाचं होतं. अशात सर्वात पहिला विकेट पडिक्कलचा घेतला तो केकेआरचा स्टार गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav). विशेष म्हणजे उमेशने देवदत्तची विकेट घेताना गोलंदाजी करतानाच त्याचा अप्रतिम कॅचही घेतला. ज्यामुळे पडिक्कल दोन धावांवर बाद झाला. हा व्हिडीओ आयपीएलने त्यांच्या साईटवर शेअर केला आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


केकेआर राजस्थानच्या मागे


आतापर्यंतच्या आयपीएलचा विचार करता केकेआरने 9 पैकी 3 सामने जिंकल्याने ते आठव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे राजस्थान संघाने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्यात आज दोन्ही संघात सामना सुरु आहे. या सामन्यात संघासह दोन गोलंदाजांमध्येही चुरशीची लढाई आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये उमेश यादवने 9 सामने खेळत त्यात 14 विकेट्स घेतले आहेत. यावेळी 23 रन देत 4 विकेट्स घेणं त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून चहलने 9 सामन्यात 19 विकेट्स घेतले आहे. 40 रन देत 5 विकेट्स घेणं हे चहलचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून आज दोघांपैकी कोण किती विकेट्स घेणार यानंतर पुढील आकडेवारी स्पष्ट होईल. या 


हे देखील वाचा-