IPL 2022: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2022 रोजी महेंद्रसिंह धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सुरेश रैना आयपीएल खेळण्यासाठी यूएई गेला होता. परंतु, आयपीएल सुरू होण्यापूर्वीच वयैक्तिक कारणांमुळं त्यानं चेन्नईच्या संघाचं बायो बबल सोडलं. त्यानंतर आयपीएलच्या मागच्या हंगामात तो चेन्नईच्या संघाकडून खेळताना दिसला. परंतु, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याला विकत घेण्यासाठी उस्तुकता दाखवली नाही.  


आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैना अनसोल्ड ठरला. त्यानंतर यंदाच्या हंगामात त्यानं कमेंट्री करण्याचं ठरवलं आणि तो कमेंट्री बॉक्समध्येही दिसला. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात प्रेक्षकांना त्याचा आवाज ऐकायला मिळत होता. परंतु, काही सामन्यांपासून तो कमेंट्री करत नाही. यातच तो पुन्हा आयपीएल खेळणार, अशा चर्चाणा उधाण आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रैनाचं स्टार स्पोर्ट्ससोबत असलेला करार संपला होता. ज्यामुळं त्याला कमेंट्रीचा पॅनल सोडवा लागला होता. 


ट्विट-



दरम्यान, सुरेश रैनाचं आयपीएलमध्ये पुनारागमन झालं असून पुन्हा एकदा तो कंमेट्री करताना दिसणार आहे. सुरेश रैनानं स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या ट्विटसह सुरेश रैनानं सोशल मीडियावर त्याचे फोटोही टाकले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुरेश रैनानं लिहलंय की, तुम्हाला काय वाटतं आजचा सामना कोण जिंकणार? मायकवर आवाज ऐकण्यासाठी तयार राहा.


सुरेश रैनाची आयपीएलमधील धावा
आयपीएलच्या कारकिर्दीत सुरेश रैनानं 205 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 32.5 सरासरीनं 5 हजार 528 धावा केल्या आहेत. 


हे देखील वाचा-