KKR vs GT: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 35 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (Kolkata Knights Vs Gujarat Titans) यांच्यात लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खाननं (Rashid Khan) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कोलकाताविरुद्ध सामन्यात त्यानं व्यंकटेश अय्यरला बाद करून आयपीएलमधील 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? 
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत लसिथ मलिंका अव्वल स्थानी आहे. त्यानं केवळ 70 सामन्यात 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 82 सामन्यात 100 विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अमित मिश्रा, आशीष नेहरा आणि आजच्या सामन्यात विक्रम रचणारा राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंरतु, आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेणारा अमित मिश्रा पहिला फिरकीपटू ठरला होता. त्यानंतर राशिद खानला अशी कामगिरी करता आली. त्यानंतर युजवेंद्र चहल चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 84 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत सुनील नारायण पाचव्या क्रमांकावर आहेत. 100 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 86 सामने खेळावे लागले. 



आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज
1) लसिथ मलिंगा- 70 सामने
2) भुवनेश्वर कुमार- 82 सामने
3) अमित मिश्रा / आशीष नेहरा / राशिद खान- 83 सामने
4) युजवेंद्र चहल- 84 सामने
5) सुनील नारायण- 86 सामने


कोलकाताविरुद्ध राशिद खानची दमदार गोलंदाजी
कोलकाताविरुद्ध सामन्यात राशिद खााननं उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं चार षटकात 22 धावा देत दोन विकेट्स घेतले. या कामगिरीमुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


हे देखील वाचा-