No-Ball Controversy: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) यांच्यात शुक्रवारी  झालेल्या सामन्यातील शेवटच्या षटकात बराच वाद झाला. हा वाद इतका वाढला की, कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या फलंदाजांना माघारी बोलावण्याचा इशारा दिला. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला 20 व्या षटकातील तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांनी दिलेल्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलं. यावर सहायक प्रशिक्षक शेन वॉटसननं (Shane Watson) प्रतिक्रिया दिली आहे. 


शेन वॉटसन काय म्हणाला?
राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना संपल्यानंतर शेन वॉटसन म्हणाला की, "शेवटच्या षटकात जे घडलं ते खूपच निराशाजनक होतं. पंचाचा निर्णय योग्य असो वा अयोग्य? तो आपल्याला मान्य करावा लागतो. सामना सुरू असताना मैदानात घुसून पंचाशी वाद घालणं योग्य नाही"


नेमकं काय घडलं?
या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला.तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आम्रेंनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.


राजस्थानविरुद्ध दिल्ली सामन्यात नो बॉलवरून रंगलेल्या वादानंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. या वादावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडलं आहे. परंतु, दिल्लीचे चाहते हा नो बॉल असल्याचं म्हणत पंचांच्या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत. 


हे देखील वाचा-