Rishabh Pant Vs Sanju Samson: आयपीएल 2022 च्या 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले.  या हाय व्होल्टेज सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलं. ओबेड मॅकॉयनं टाकलेला 20 व्या षटकातील तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. ज्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं वाद घालायला सुरुवात केली. यावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं प्रतिक्रिया दिली आहे. 


या सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला.तसेच कर्णधाराच्या सांगण्यावरून प्रवीण आम्रेंनी  मैदानात जाऊन अंपायरशी वाद घातला.


संजू सॅमसन काय म्हणाला?
"तो एक षटकार होता, हा फूल टॉस बॉल होता. पंचांनी त्याला वैद्य चेंडू ठरवलं. परंतु दिल्लीचे फलंदाज या चेंडूला 'नो-बॉल' देण्याची मागणी करत होते.  मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंच आपल्या निर्णयावर ठाम होते".


या हंगामातील बटलरचं तिसरं शतक
आयपीएलचा पंधरावा हंगाम जोस बटलरसाठी सरस ठरला आहे. त्यानं या हंगामात तीन शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिल्लीविरुद्ध त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. मला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळायला आवडतं. मी आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्वरूपाचा आनंद घेत आहे आणि तो असाच पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.


हे देखील वाचा-