KKR vs DC, IPL 2023 Live : अटतटीच्या लढतीत दिल्लीचा विजय

IPL 2023, Match 28, KKR vs DC: दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरणार आहे....

नामदेव कुंभार Last Updated: 21 Apr 2023 12:22 AM
अटतटीच्या लढतीत दिल्लीचा विजय

अटतटीच्या लढतीत दिल्लीचा विजय

दिल्लीला तिसरा धक्का, मिचेल मार्श आणि साल्ट बाद

दिल्लीला तिसरा धक्का, मिचेल मार्श आणि साल्ट बाद

दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ बाद

दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ बाद

दिल्लीचा भेदक मारा, कोलकात्याचा डाव 127 धावांत आटोपला

दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि अनरिख नॉर्खिया यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कोलकात्याचा संघ 20 षटकात 127 धावांपर्यंत मजल मारु शकला.  नाणेफेक जिंकून डेविड वॉर्नर यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात तीन षटकार लगावल्यामुळे कोलकाता 127 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीला विजायासाठी 128 धावांचे आव्हान देण्यात आलेय. 

कोलकात्याची दैयनीय अवस्था... 98 धावांत नऊ गडी तंबूत

कोलकात्याची दैयनीय अवस्था... 98 धावांत नऊ गडी तंबूत

कोलकात्याला तिसरा धक्का, कर्णधार तंबूत परतला

कोलकात्याला तिसरा धक्का, कर्णधार तंबूत परतला

वेंकटेश अय्यर बाद

कोलकात्याला पहिला धक्का

कोलकात्याला पहिला धक्का, लिटन दास बाद

कोलकाता नाइट रायडर्स-

जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), मनदीप सिंह, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.




 


दिल्ली कॅपिटल्स-

 डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हाकिम खान, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.

दोन्ही संघात बदल

दिल्लीने इशांत शर्मा आणि फिल साल्ट यांना संधी दिली आहे. तर कोलकात्याने लिटन दास आणि जेसन रॉय यांना स्थान दिलेय.. कोलकात्याने आज लॉर्ड शार्दुल ठाकूर याला प्लेईंग 11 च्या बाहेर ठेवलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 

शार्दूल ठाकूर संघाबाहेर, कोलकात्यामध्ये चार बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना जवळपास तासभर उशीराने सुरु होत आहे. पावसामुळे मैदान संथ झाले असेल.. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना धावा जमवणे कठीण जाम्याची शक्यता आहे. कोलकाता संघाने आपल्या संघात चार बदल केले आहेत. तर दिल्लीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 

पावसामुळे सामना उशीरा सुरु होणार

पावसामुळे सामना उशीरा सुरु होणार

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 28, KKR vs DC : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली आणि कोलकाता (DC vs KKR) या दोन संघांमध्ये होणार आहे. 16 व्या हंगामातील 28 वा सामना आज (19 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली आज पहिला विजय मिळवून खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.


KKR vs DC IPL 2023 : कोलकाता की दिल्ली कोण मारणार बाजी?


दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या उलट कोलकाताने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. 


KKR vs DC Head To Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता संघाने 30 सामन्यांपैकी 16 सामने जिंकले आहेत, दिल्लीला 14 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 Arun Jaitley Stadium, Delhi Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium, Delhi) मैदानावर अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.


KKR vs DC, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


दिल्ली (DC) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.









आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.