KKR vs DC Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली आणि कोलकाता (DC vs KKR) या दोन संघांमध्ये होणार आहे. 16 व्या हंगामातील 28 वा सामना आज (19 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली आज पहिला विजय मिळवून खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.


KKR vs DC IPL 2023 : कोलकाता की दिल्ली कोण मारणार बाजी?


दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या उलट कोलकाताने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. 


KKR vs DC Head To Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता संघाने 30 सामन्यांपैकी 16 सामने जिंकले आहेत, दिल्लीला 14 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


KKR vs DC, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


दिल्ली (DC) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs PBKS Match Preview : आरसीबी की पंजाब कोण मारणार बाजी? हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...