IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 च्या 26 सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून राजस्थान रॉयल्सला (RR) पराभवाचा सामना करावा लागला लखनौ संघाने राजस्थानवर 10 धावांनी विजय मिळवला. लखनौने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान संघापुढे 155 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनौने 20 षटकात सात गडी बाद 154 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थाने संघाला 20 षटकात 144 धावाच करता आल्या आणि हा सामना लखनौने खिशात घातला. दरम्यान, सामन्यात पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स आयपीएल गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.


पराभवानंतरही राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. लखनौ विरुद्ध पराभवानंतर लखनौ आणि राजस्थान दोन्ही संघांकडे प्रत्येकी 8 गुण झाले आहेत. मात्र, राजस्थान संघाचा नेट रेनरेट अधिक असल्यामुळे राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थान संघाचा नेट रनरेट 1.043 आहे, तर लखनौ संघ 0.709 नेट रनरेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK), गुजरात टायटन्स (GT), पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. या चारही संघांकडे प्रत्येकी 6 गुण आहेत.






गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आठव्या तर सनरायजर्स हैदराबाद (SRH) नवव्या स्थानावर आहे. कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबाद संघाकडे प्रत्येकी 4 गुण आहे.




(PC : IPL)


दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


LSG vs RR IPL 2023 : लखनौच्या नवाबांचा राजस्थानवर 'रॉयल' विजय