LSG vs RR Match Highlights : केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कमी धावसंख्येच्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना बाद केले. लखनौने राजस्थानवर 10 धावांनी विजय मिळवला. लखनौने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 144 पर्यंत मजल मारु शकला. लखनौकडून आवेश खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


लखनौने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने संयमी सुरुवात केली. याचा फटका राजस्थानला बसला.  यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात, पण या जोडीने संथ फलंदाजी केली. जोस बटलर याने 41 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. जोस बटलर याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी होता.. जोस बटलर याने आपल्या संथ फंलदाजीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. जोस बलटर याच्याशिवाय यशस्वीनेही संथ फलंदाजी केली. यशस्वीने 35 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.  यशस्वी आणि जोस बटलर यांनी 11.3 षटकात 87 धावांची भागिदारी केली. यशस्वी जायस्वाल याला स्टॉयनिसने तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन धावबाद झाला... संजूला फक्त दोन धावांचे योगदान देता आले. जोस बटलर यानेही विकेट फेकली. शिमरोन हेटमायरही आज अपयशी ठऱला. हेटमायरचा अडथळा आवेश खान याने दूर केला. बिनबाद 87 वरुन राजस्थान चार बाद 104 धावसंख्या अशी दैयनिय अवस्था झाली होती. त्यानंतर पडिक्कल याने एका बाजूने किल्ला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ मिळाली नाही. पडिक्कल 26 धावा काढून बाद झाला. ध्रुव जेरल याला खातेही उघडता आले नाही. रियान पराग 15 धावांवर नाबाद राहिला. 


लखनौच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. नवीन उल हक याने चार षटकात फक्त 19 धावा दिल्या. आवेश खान याने चार षटकात 25 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर मार्कस स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.   


दरम्यान, काइल मेयर्स याच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 154 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले.  पूरन आणि स्टॉयनिस यांनी फिनिशिंग टच दिला, त्यामुळे लखनौचा संघ 150 पार पोहचू शकला. राजस्थानकडून अश्विन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.  


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौने संथ सुरुवात केली. केएल राहुल आणि काइल मेयर्स यांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी केली. राहुल आणि मेयर्स यांनी 10.4 षटकात 82 धावांची सलामी भागिदारी केली. सलामी जोडीने लखनौला दमदार सुरुवात करुन दिली. पण लखनौचा डाव अचानक ढेपाळला. रहाबहुल बाद झाल्यानंतर आयुष बडोनी याला बोल्टने अवघ्या एका धावेंवर तंबूत पाठवले. तर अश्विनने दीपक हुड्डाला दोन धावांवर बाद केले. त्यानंतर अखेरीस निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरला. मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी फिनिशिंग टच दिला. निकोलस पूरन आणि स्टॉयनिस यांच्या विस्फोटक खेळीच्या बळावर लखनौचा संघ 154 धावांपर्यंत पोहचू शकला.


राहुल-मेयर्सचा झंझावत - 


कर्णधार केएल राहुल आणि काइल मेयर्स यांनी संयमी सुरुवात केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोघांनीही चौफेर फटकेबाजी केली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात लखनौने फक्त 37 धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही सलामी फलंदाजांनी आक्रमक रुप धारण केले. केएल राहुल आणि मेयर्स यांनी 10.4 षटकात 82 धावांची सलमी दिली. केएल राहुल याने 32 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुलने चार चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला. काइल मेयर्स याने अर्धशतकी खेळी करत लखनौची धावसंख्या वाढवली. काइल मेयर्स याने 42 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. या दोघांचा अपवाद वगळता लखनौच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. 


स्टॉनिस-पूरनचे फिनिशिंग - 


एकवेळ सुस्थितीत असणारा लखनौचा डाव अचानक कोसळला. एकापाठोपाठ एक चार विकेट ठरावीक अंतराने गेल्या. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी लखनौचा डाव सावरला. अखेरच्या षटकात दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली. स्टॉयनिसने 31 तर निकोलस पूरन याने 29 धावांचे योगदान दिले.


राजस्थानची गोलंदाजी कशी ?


राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. चहल आणि होल्डर यांचा अपवाद वगळता इतरांनी भेदक मारा केला. चहल याला आज एकाही विकेट घेता आली नाही. त्याने चार षटकात 41 धावा खर्च केल्या. जेसन होल्डर याने चार षटकात 38 धावा खर्च करत एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्ट याने भेदक मारा करत चार षटकात अवघ्या 16 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. संदीप शर्मा यानेही एक विकेट घेतली. राजस्थानकडून अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने चार षटकात 23 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत धाडले.