PBKS vs RCB Match Preview : आयपीएलमध्ये (IPL 2023) आज डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवले जाणार आहेत. 16 व्या हंगामातील 27 वा सामना आज (RCB vs PBKS) (19 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात पाहायला मिळणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Punjab Cricket Association Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली विरुद्ध शिखर धवन अशी रोमांचक लढत पाहायला मिळेल. 


RCB vs PBKS IPL 2023 : बंगळुरु की पंजाब कोण मारणार बाजी?


पंजाब किंग्स मागील सामन्यात विजयानंतर तर आरसीबी मागील सामन्यात पराभवानंतर आज मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवानंतर या सामन्यात उतरणार आहे. 


RCB vs PBKS Head To Head : हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पंजाब संघाचं पारड जड दिसून आलं आहे. पंजाब संघाने 30 सामन्यांपैकी 17 सामने जिंकले आहेत, आरसीबीला फक्त 13 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






PBKS vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


बंगळुरु (RCB) आणि पंजाब (PBKS) यांच्यात 20 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता खेळवण्यात येईल. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.






IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : लखनौकडून राजस्थानचा पराभव, गुणतालिकेची सध्याची स्थिती जाणून घ्या