IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकोणीसव्या सामन्यात कोलकाता आणि दिल्ली (KKR VS DC) आमने-सामने आले. या सामन्यात दिल्लीनं कोलकात्याला 44 धावांनी पराभूत केलं. हा सामन्यात दिल्लीच्या संघानं या हंगामातील सर्वाधिक स्कोर केलाय. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघानं कोलकात्यासमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात कोलकातच्या संघाला 171 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) उत्कृष्ट झेल पकडला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.


कुलदीपची उत्कृष्ट गोलंदाजी
दिल्लीचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात चमकदार कामगिरी केली त्यानं कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, सुनील नारायण आणि उमेश यादव यांना  माघारी धाडलं. केकेआरच्या डावाच्या 16व्या षटकात कुलदीपनं एक सुरेख चेंडू टाकला.  त्या चेंडूवर उमेश यादव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, योग्य टायमिंग न झाल्यानं चेंडू हवेत उडला. त्यावेळी कुलदीप यादवनं चेंडूच्या मागे धावत उत्कृष्ट झेल पकडला.


व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
कुलदीपच्या या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कुलदीप यादवनं चार षटकात चार विकेट्स घेऊन कोलकात्याचं कंबरडं मोडलं. या कामगिरीसाठी कुलदीप यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, कुलदीप बराच काळ कोलकात्याच्या संघाचा भाग होता. पण आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं त्याला रिलाज केल. त्यानं दिल्लीच्या संघानं त्याच्यावर बोली लावत त्याला संघात समील करून घेतलं. या हंगामात कुलदीप यादवनं जबरदस्त गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


हे देखील वाचा-