SRH vs GT:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकवीसव्या सामन्यात हैदराबादचा संघ गुजरातशी (Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans) भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडिअमवर  (Dr DY Patil Sports Academy) हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं एकही सामना गमावलेला नाही. गुजरातनं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात विजय मिळवून सहा गुणांसह गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


दुसरीकडं चेन्नईच्या संघाला पराभूत करून विजयाचा खातं उघडणारा हैदराबादचा संघ दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. हैदराबादला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. दरम्यान, हैदराबाद आणि गुजरात यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात विक्रमांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), डेव्हिड मिलर (David Miller), राशीद खान (Rashid Khan), केन विल्यमसन (Kane Williamson) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) नव्या विक्रमाला गवसणी घालू शकतात.


हार्दिक पांड्या
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 99 षटकार मारली आहेत. षटकारांचं शतक पूर्ण करण्यासाठी हार्दिकला केवळ एका षटकाराची गरज आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये हार्दिकनं 98 झेल घेतल्या आहेत. याशिवाय, आयपीएलमधील 50 विकेट घेण्यापासून हार्दिक पांड्या सहा विकेट्स दूर आहे.


डेव्हिड वार्नर
गुजरातचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर त्याच्या T20 कारकिर्दीत 350 षटकारांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 3 षटकार दूर आहे. याशिवाय मिलर टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यापासून 76 धावा दूर आहे. या सामन्यात तो हा विक्रमही करू शकतो.


राशिद खान
गुजरातचा स्टार फिरकीपटू राशिद खान आयपीएलमध्ये 100 विकेट्सपासून केवळ 2 विकेट दूर आहे. राशिद खान या सामन्यात शंभर विकेट्स घेण्याचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करेल.


केन विल्यमसन
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून केवळ 65 धावा दूर आहे.


निकोलस पूरन
हैदराबादचा फलंदाज निकोलस पूरन टी-20 क्रिकेटमध्ये 300 षटकारांपासून 3 षटकार दूर आहे.


हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकिपर), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन, श्रेयस गोपाल, जगदीशा सुचित, रविकुमार समर्थ, ग्लेन फिलिप्स, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, रोमॅरियो शेफर्ड, फजलहक फारुकी, अब्दुल समद, सौरभ दुबे.


गुजरातचा संघ: मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे, जयंत यादव, विजय शंकर, वरुण आरोन, वृद्धिमान साहा, प्रदीप सांगवान, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, यश दयाल, नूर अहमद.



हे देखील वाचा-