IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरनं तुफानी फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली.


नाणेफेक गमवल्यानंतर राजस्थानकडून मैदानात उतरलेल्या जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चार चषकात राजस्थाननं 39 धावा केल्या. मात्र, पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर आवेश खाननं जॉस बटलरच्या रुपात राजस्थानच्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसननं त्याची विकेट्स गमावली. त्यानं 12 चेंडूत 13 धावा केल्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायरनं आणि आर. अश्विननं तडाखेबाज फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. हेटमायरनं 36 चेंडूत 59 धावा केल्या. तर, अश्विननं 23 चेंडूत 28 धावा केल्या. ज्यामुळं राजस्थाननं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं. लखनौकडून होल्डर आणि कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खाननं एक विकेट्स मिळवली.


राजस्थानचा संघ-
जॉस बटलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर) शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.


लखनौचा संघ-
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान.