KKR vs RCB : शाहरुख खानच्या उपस्थितीत कोलकाताची बाजी, केकेआरच्या गोलंदाजीपुढे आरसीबी फेल
IPL 2023, Shah Rukh Khan, KKR vs RCB : शाहरुख खानच्या उपस्थिती आयपीएल 2023 मध्ये कोलकाता संघाने (KKR) घरच्या मैदानावर आरसीबीवर (RCB) दणदणीत विजय मिळवला.
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरने आरसीबीवर 81 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकाताने मालक शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) उपस्थिती यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवून आपलं खातं उघडलं आहे. शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खानही (Suhana Khan) संघाचा उत्साह वाढवताना दिसली.
IPL 2023, RCB vs KKR : कोलकाताकडून आरसीबीचा दारुण पराभव
आयपीएलमध्ये गुरुवारी कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden Cricket Stadium) मैदानावर केकेआरने (KKR) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पहिला विजय नोंदवला. केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला. तर अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) ही मैदानावर सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. तसेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही (Suhana Khan) ईडन गार्डनवर सामना पाहताना दिसली.
IPL 2023, KKR vs RCB : शाहरुख खानच्या उपस्थितीत केकेआरं सामना जिंकला
A memorable first victory of #TATAIPL 2023 at home.@KKRiders secure a clinical 81-run win over #RCB ⚡️⚡️
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
Scorecard - https://t.co/J6wVwbsfV2#TATAIPL | #KKRvRCB pic.twitter.com/0u57nKO57G
IPL 2023, KKR vs RCB : आयपीएल 2023 मध्ये कोलकाताचा पहिला विजय
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) नवव्या सामन्यात (IPL 2023 Match 9) कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव केला. केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला. गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या.
IPL 2023, KKR vs RCB : कोलकाताचा आरसीबीवर 81 धावांनी विजय
शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :