नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे वर्ल्डमध्ये न्यूझिलंड विरोधात आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच खेळला होता. तेव्हापासून धोनी मैदानापासून लांब आहे. वेस्ट इंडिज विरोधात ट्वेंट-ट्वेंटी सीरीजआधी धोनी मैदानात पुनरागमन करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, असंही काही झालं नाही.
त्यानंतर धोनी आयपीएलच्या 13व्या सीझनसाठीच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला होता. परंतु, कदाचित कोरोनाला धोनीचं पुनरागमन मान्य नव्हतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच खेळाडूंना आपल्या घरी परत जावं लागलं. अशातच आयपीएल आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे धोनीच्या प्रभावी खेळीमुळे प्रभावित आहेत. अनेकांचा आवडता क्रिकेट प्लेयर धोनी असल्याचंही त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. आता या लिस्टमध्ये क्रिकेटर जोस बटलरचाही समावेश होऊ शकतो.
इंग्लंडचा विकेटकिपर, फलंदाज जोस बटलरने सांगितलं की, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी माझा आदर्श खेळाडू आहे. आयपीएल दरम्यान, धोनीला पाहून खूप काही शिकायला मिळालं. बटलरने पुढे बोलताना सांगितलं की, 'धोनी ज्याप्रकारे आपल्या चाहत्यांकडून येणारा दबाव सांभाळताना अत्यंत कठिण काळातही उत्तम कामगिरी करत आहे. ते खरचं शिकण्यासारखं आहे.'
बटलरने लँकाशायर काउंटी क्रिकेट क्लबला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'धोनी नेहमीच माझ्यासाठी आदर्श आहे. त्यांच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. लोकांना नेहमी धोनीला पाहायचं असतं.'
बटलर म्हणाला की, 'धोनीला पाहणं माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. धोनीला पाहूनच संकटकाळात उत्तम कामगिरी करण्याचा धडा मिळाला. निश्चितपणेच ही फार मोठी गोष्ट आहे.' बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थिगित करण्यात आलं आहे. बटलरने सांगितलं की, 'आयपीएलने प्रेशर हॅन्डल करायला शिकवलं आहे.'
बटलर पुढे बोलताना म्हणाला की, 'भारतात खेळताना तुम्हाला एक प्रकारचं प्रेशर हॅन्डल करावं लागतं. एक विदेश खेळाडू असण्यासोबतच तुम्ही त्या खेळणाऱ्या चार खेळाडूंपैकी एक असता. तुम्हाला माहित असतं की, बाहेर जे चार खेळाडू बसले आहेत तेदेखील जागतिक स्तरावर खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रभावी खेळी करणं गरजेचं असतं.' पुढे बोलताना बटलर म्हणाला की, 'त्यामुळे माझ्यासाठी ही शिकण्याची गोष्ट आहे.'
संबंधित बातम्या :
दिग्गज फुटबॉलर चुन्नी गोस्वामी यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास
Olympic 2020 | ... तर ऑलिम्पिक रद्द होणार; टोकियो ऑलिम्पिक कमिटीचा इशारा
Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?
Wimbledon | यंदा विम्बल्डनचं आयोजन नाही, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द