मुंबई-चेन्नईचा एल क्लासिको, कोण मारणार बाजी, प्लेईंग 11 मध्ये कोण कोण? A टू Z माहिती
IPL 2024, MI vs CSK : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये एल क्लासिको सामना पाहयला मिळणार आहे.
IPL 2024, MI vs CSK : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये एल क्लासिको सामना पाहयला मिळणार आहे. रविवारी होणाऱ्या डबल हेडरमधील हा दुसरा सामना असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता रंगतदार सामना होणार आहे. रोहित शर्मा आणि एमएस धोनी यासारखे दिग्गज खेळाडू आमनेसामने असतील. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील हा 29 वा सामना असेल.
चेन्नई आणि मुंबईसाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असेल. मुंबई इंडियन्स गतविजेत्या चेन्नईचा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे चेन्नईचा संघ चौथा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी मैदानात उतरेल. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईचा संग गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, तर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला विजय गरजेचा आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि चेन्नईची प्लेईंग 11 कशी असेल.. खेळपट्टी कशी असेल? याबाबत जाणून घेऊयात..
पिच रिपोर्ट
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक मानली जातेय. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी अधीक मदत करते. पण या मैदानावर धावांचा पाऊस पडतो. मुंबई आणि आरसीबी यांच्यामध्ये याच मैदानावर नुकताच सामना झाला. आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईने 15.3 षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात 199 धावांचा पाऊस पाडला होता.
दोन्ही डावात फलंदाजांना मदत मिळाली होती. पण संध्याकाळच्या सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला जास्त फायदा होतो. दव पडत असल्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. मुंबईची धुरा यंदा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असेल तर चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड संभाळत आहे.
मॅच प्रिडिक्शन
मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील सुरुवात अतिशय खराब झाली होती. मुंबईला सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईने पाच सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. दुसरीकडे चेन्नईने पाच सामन्याती तीन विजय मिळवले आहेत. मुंबईला घरच्या मैदानावर हरवणं चेन्नईला सोपं जाणार नाही. मुंबईने मागील दोन्ही सामने शानदार पद्धतीने जिंकले आहेत. सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळे मुंबईची ताकद वाढली आहे. आजच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड दिसतेय.
चेन्नईविरोधात मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रित बुमरा, जेराल्ड कोएत्जी, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट प्लेयर- सूर्यकुमार यादव.
मुंबई इंडियन्सविरोधात चेन्नईचे 11 धुरंधर -
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, समीर रिजवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महीश तीक्षणा.
इम्पॅक्ट प्लेयर- शिवम दुबे.