IPL Mega Auction 2025 : लिलावाच्या पहिल्या दिवशी रिकॉर्ड ब्रेक बोली, पंत, श्रेयसचा डंका! पडिक्कल-वॉर्नरला राहिले Unsold, जाणून घ्या सर्वकाही
IPL Auction 2025 Live Updates in Marathi : आयपीएल 2025 मेगा लिलाव आजपासून जेद्दाहमध्ये आहे. या लिलावात 577 खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. लिलावासाठी एकूण 641 कोटी रुपये आहे.
किरण महानवरLast Updated: 24 Nov 2024 11:23 PM

पार्श्वभूमी
IPL Mega Auction 2025 Live Updates : आयपीएल 2025 साठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथील मेगा लिलावाचा पहिला दिवस संपला आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आणि ऋषभ पंत...More
IPL Mega Auction 2025 Live Updates : आयपीएल 2025 साठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथील मेगा लिलावाचा पहिला दिवस संपला आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आणि ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची विक्रमी किमतीत विक्री झाली. पहिला श्रेयस पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतला. तोपर्यंत श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, काही काळानंतर ऋषभ पंत लिलावात उतरला आणि त्याला लखनौ सुपरजायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. अशा प्रकारे पंत हा आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू ठरला. पंत आणि श्रेयसने या प्रकरणात मिचेल स्टार्कला मागे टाकले.पंत आणि श्रेयस व्यतिरिक्त पहिल्या दिवशी व्यंकटेश अय्यरवरही मोठ्या बोली लावल्या गेल्या, ज्याला कोलकाता नाइट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि केएल राहुल यांच्यावरही मोठी बोली लावण्यात आली. अर्शदीप आणि चहल यांना पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याचवेळी दिल्लीने राहुलचा 14 कोटी रुपयांत संघात समावेश केला. दरम्यान, नेहल वढेरा, सुयश शर्मा आणि अब्दुल समद यांसारख्या अनकॅप्ड खेळाडूंवरही फ्रँचायझींनी खूप पैसा खर्च केला आणि हे खेळाडू करोडपती झाले.आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी देवदत्त पडिक्कल, जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही आणि ते विकले गेले नाहीत. रविवारी एकूण 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, त्यापैकी 72 खेळाडूंवर 467.95 कोटी रुपये खर्च झाले, तर 12 खेळाडूंना कोणीही विकत घेतले नाही.
IPL Mega Auction 2025 Live : अनकॅप्ड फिरकी गोलंदाजांचा सेट
आरसीबीने सुयश शर्माला 2.60 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले.
मुंबई इंडियन्सने कर्ण शर्माला त्याच्या मूळ किंमत 50 लाख रुपयांना खरेदी केले.
मयंक मार्कंडेला KKR ने त्याच्या मूळ किंमत 30 लाखात विकत घेतले.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज पियुष चावलाला कोणत्याही संघाने घेतले नाही.
कार्तिकेय सिंगला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किंमत 30 लाख रुपयांना खरेदी केले.
मानव सुथारला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किंमत 30 लाखांमध्ये खरेदी केले.
कोणत्याही संघाने श्रेयस गोपालमध्ये स्वारस्य दाखवले नाही आणि तो विकला गेला नाही.