Mumbai Indians vs Delhi Capitals : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) सध्या 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्सचे (MI) संघांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघात खातं उघडणार आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. यंदाच्या हंगामात मुंबई संघाने दोन तर दिल्ली संघाने तीन सामने गमावले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर 11 एप्रिल रोजी मंगळवारी रात्री 7.30 वाजता हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. दिल्लीने या मोसमात पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. आता वॉर्नर अँड कंपनी घरच्या मैदानावर त्यांचा पहिला विजय मिळवणार ही की मुंबई हे पाहावं लागणार आहे. 


पाच वेळचा चॅम्पियन मुंबई संघ तोंडघशी


आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स तोंडघशी पडली आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहितच्या पलटणमध्ये चेन्नई सुपर किंग्सनंही मुंबईचा पराभव केला. मुंबईच्या स्टार खेळाडूंनी आतापर्यंत निराशा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा स्वत: फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला आहे, तर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.


जोफ्रा आर्चर गेल्या सामन्याला मुकला


पहिल्या दोन सामन्यात मुंबईचे गोलंदाजही विशेष कामगिरी दाखवू शकले नाहीत. पहिल्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा वेग संघासाठी उपयुक्त ठरला नाही, तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शद खान देखील छाप पाडण्यात अपयशी ठरले आहेत. जोफ्रा आर्चर मुंबईसाठी शेवटचा दुसरा सामना खेळला नाही. तो आजच्या सामन्यासाठीही उपलब्ध होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे.


दिल्ली कॅपिटल्सची परिस्थितीही वाईट


दिल्ली कॅपिटल्सची परिस्थितीही मुंबई इंडियन्सपेक्षा वाईट आहे, असं म्हणायला हवं. दिल्लीने आयपीएल 2023 मध्ये पराभवाची हॅटट्रिक केली आहे. सलग तीन सामन्यांम्धेय दिल्ली पराभव पत्करावा लागला आहे. फलंदाजीत पृथ्वी शॉ आणि मनीष पांडेसारखे फलंदाज सलग सामन्यांमध्ये स्वस्तात तंबूत परतले आहेत, तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विदेशी फलंदाज रिले रॉसौ आणि रोव्हमन पॉवेल यांनाही अद्याप आपली ताकद दाखवता आलेली नाही. मिचेल मार्श गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही खेळताना दिसणार नाही.


दिल्लीने गोलंदाजही अपयशी


दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनीही या मोसमात आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. खलील अहमदने मागील सामन्यात 2 षटकात 31 धावा दिल्या होत्या, तर एनरिक नोर्कियाने 4 षटकात एकही विकेट न घेता 44 धावा दिल्या होत्या. कुलदीप आणि अक्षरची जादू फिरकीही चालली नाही.


दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयर


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11 (प्रथम फलंदाजी) : 


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, रिले रॉसू, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), चेतन साकारिया, कुलदीप यादव, एनरिक नोर्किया.


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11 (प्रथम गोलंदाजी) : 


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिले रॉसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), चेतन साकारिया, कुलदीप यादव, एनरिक नोर्किया, मुकेश कुमार.


दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट खेळाडू : मुकेश कुमार/पृथ्वी शॉ.


मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 (प्रथम फलंदाजी) : 


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, पियुष चावला, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर.


मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 (प्रथम गोलंदाजी) : 


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, पीयूष चावला, हृतिक शोकीन, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर.


मुंबई इंडियन्सचे प्रभावशाली खेळाडू : कुमार कार्तिकेय/तिलक वर्मा


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : मुंबईची पलटन पहिला विजय मिळवणार? कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मासह 'या' 5 खेळाडूंकडे लक्ष