IPL Auction 2024 : दुबईत झालेल्या लिलावात माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सवर पैशांचा पाऊस पाडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ते दोघेही खूप चांगले खेळाडू आहेत असे त्याने म्हटले आहे पण खरच किंमत इतकी जास्त असायला हवी होती का? एका क्रिकेट चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना डिव्हिलियर्सने हे सांगितले.


लिलावानंतर, यूट्यूब सेशनमध्ये एका चाहत्याने डिव्हिलियर्सला मुंबई इंडियन्सच्या लिलावाच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारला. या चाहत्याने विचारले की मुंबईने लिलावात चांगले निर्णय घेतले का? यावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज म्हणाला, 'त्यांनी काही अतिशय बुद्धिमान बोली लावल्या. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे काही संघही लिलावात चांगले निर्णय घेतात. हुशारीने खेळाडूंची निवड करतात, भावनिक होऊन निर्णय घेत नाही. कमिन्स आणि स्टार्क हे खरोखरच अप्रतिम खेळाडू आहेत पण खरंच? त्याची इतकी किंमत आहे का?'






डिव्हिलियर्स म्हणाला की, 'मागणी काय होती ते सांगते. या वर्षी लिलावात वेगवान गोलंदाजांची मागणी सर्वाधिक होती. आणि जेव्हा एखाद्याची मागणी वाढेल तेव्हा किंमत नक्कीच वाढेल.


स्टार्क आणि कमिन्स हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू 


आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना रेकॉर्डब्रेक किमतीत विकले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले, तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सवर 20.50 कोटींची बोली लावली. या मोठ्या किमतीसह हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडूही ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम सॅम कुरन (18.50 कोटी)च्या नावावर होता.


धोनी-विराट अन् रोहितचा सगळा मिळून कमिन्स अन् स्टार्कच्या 45 कोटींएवढा पगार होत नाही! 


पॅट कमिन्स आणि स्टार्कला मिळालेल्या बोलीने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे किंग कोहली, रोहित शर्मा आणि धोनीचा आयपीएलमधील एकत्रित पगार केल्यानंतरही दोघांएवढा पगार होत नाही. 


2024 चे टॉप 10 आयपीएल पगार 


मिचेल स्टार्क - 24.75 कोटी
पॅट कमिन्स - 20.50 कोटी.
सॅम करन - 18.5 कोटी.
कॅमेरॉन ग्रीन - 17.5 कोटी 
केएल राहुल - 17 कोटी
रोहित शर्मा - 16  कोटी
रवींद्र जडेजा - 16 कोटी
ऋषभ पंत - 16 कोटी
आंद्रे रसेल - 16 कोटी
निकोलस पूरन - 16 कोटी


इतर महत्वाच्या बातम्या