Rohit Sharma Role In Mumbai Indians : जेव्हापासून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 साठी कर्णधार म्हणून निवडले आहे, तेव्हापासून एका प्रश्नावर सतत चर्चा होत आहे. रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्स संघात काय भूमिका घेणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक क्रिकेट तज्ज्ञ या विषयावर आपली मते मांडत आहेत. 


मुंबईनं भरल्या डोळ्यांनी फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली! 


रोहितच्या आयपीएल भूमिकेवरून सोशल मीडियापासून ते पार आयपीएल संघ मालकांपर्यंत होत असतानाच आता मुंबई इंडियन्सने ट्विटरवर फोटो शेअर करत लक्ष वेधले आहे. रोहितची पत्नी रितीकाचा आज (21डिसेंबर) वाढदिवस आहे. नेमकी हीच संधी साधत फोटो शेअर करत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. रितीका आणि रोहितचा फोटो शेअर करत मुबंईने तू आमची नेहमीच नंबर 1 पाठिराखी असल्याचे म्हटले आहे. सोबत भरल्या डोळ्यांचा इमोजी शेअर केला आहे.  त्याचबरोबर रितीका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेही म्हटले आहे. ट्विटमध्ये रोहित शर्मालाही टॅग केलं आहे. 






रोहितच्या भूमिकेवर जयवर्धने काय म्हणाला?


दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे ग्लोबल क्रिकेट हेड महेला जयवर्धने यांनी रोहितच्या  प्रश्नाचे उत्तर दिले आहे. रोहितची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरने कर्णधारपद सोडल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली, तशीच भूमिका रोहित शर्माही बजावणार असल्याचे जयवर्धनेने म्हटले आहे. श्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला की, 'मैदानावर आणि मैदानाबाहेर रोहितची उपस्थिती आम्हाला मुंबई इंडियन्सच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यास मदत करेल. तो अतिशय हुशार क्रिकेटपटू आहे. रोहितसोबत मी खूप जवळून काम केले आहे. तो एक विलक्षण माणूसही आहे. मला विश्वास आहे की तो मुंबई इंडियन्सच्या वारशाचा एक भाग राहील जो मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करतो.






'सचिनसोबतही असंच झालं'


महेला जयवर्धने पुढे म्हणाला की, 'मुंबई इंडियन्ससोबत यापूर्वीही असे घडले आहे. सचिन तेंडुलकर तरुण क्रिकेटपटूंसोबत खेळत होता. त्याने कर्णधारपद दुसऱ्याकडे सोपवले आणि मुंबई इंडियन्स योग्य दिशेने जात असल्याची खात्री केली. रोहितचीही तीच परिस्थिती आहे. आम्ही या विषयावर चर्चा केली असून या निर्णयात सर्वांचा सहभाग आहे.






चाहत्यांचा राग अनावर 


यावेळी जयवर्धनेने सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाविरोधात क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'चाह्यांनी अशी प्रतिक्रिया देणे योग्य आहे. मला वाटतं प्रत्येकजण भावनिक असतो आणि आपण त्याचाही आदर केला पाहिजे. पण त्याचबरोबर फ्रँचायझी म्हणून तुम्हाला हे निर्णय घ्यावे लागतील.


इतर महत्वाच्या बातम्या