एक्स्प्लोर

Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं

Rinku Singh : आयपीएलच्या 2026 च्या सहाव्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. मात्र, उपकर्णधार रिंकू सिंगनं आंद्रे रसेलचा एक विक्रम मोडला आहे.  

Rinku Singh Breaks Major Record Held By Andre Russell कोलकाता: आयपीएलच्या 2026 च्या सहाव्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 65 धावांनी पराभव झाला. केकेआरचा हा यंदाच्या आयपीएलमधील दुसरा पराभव ठरला. केकेआरचा पहिला सामना मुंबईविरोधात होता, त्या सामन्यात देखील केकेआरचा पराभव झाला होता. केकेआरचे सलग दोन पराभव झाले असले उपकर्णधार रिंकू सिंगनं एका विक्रमाची नोंद केली आहे. रिंकू सिंगनं आंद्रे रसेलचा एक विक्रम मोडला आहे.  

रिंकू सिंगनं मोडला आंद्रे रसेलचा विक्रम

रिंकू सिंगनं हा विक्रम क्षेत्ररक्षणात केला आहे. रिंकू सिंगनं केकेआरसाठी आंद्रे रसेलपेक्षा अधिक कॅच घेण्याचा विक्रम केला आहे.  रिंकू सिंगनं ही कामगिरी केकेआरसाठी 61 वा सामना खेळताना केली आहे. रिंकू सिंगनं केकेआरसाठी आतापर्यंत 42 कॅच घेतले आहेत. तर, आंद्रे रसेलनं केकेआरसाठी  खेळताना 40 कॅच घेतले होते.  

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध केकेआरचा 65 धावांनी पराभव

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादनं 65 धावांनी विजय मिळवला. हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 226 धावा केल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादकडून सर्वाधिक धावा हेनरिक क्लासेन यानं केल्या. क्लासेन 52 धावा करुन बाद झाला. त्याशिवाय अभिषेक शर्मानं 48 आणि ट्रेविस हेडनं 46 धावा केल्या.  

कोलकाताचा संघ 161 धावांवर बाद 

सनरायजर्स हैदराबादनं केकेआरला विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरनं चांगली सुरुवात केली होती. फिन एलन यानं पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली मात्र तो लगेच बाद झाला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे 8 धावा करुन बाद झाला. कॅमेरुन ग्रीन आणि अंगकृष रघुवंशी दोघे धावबाद झाले. कॅमेरुन ग्रीन 2 धावांवर बाद झाला. तर, अंगकृष रघुवंशी हा 52 धावा करुन धावबाद झाला. रिंकू सिंग देखील 35 धावा करुन बाद झाला. यानंतर केकेआरचा संघ 16 ओव्हरमध्येच 161 धावांवर बाद झाला.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील केकेआरचा हा दुसरा पराभव ठरला. केकेआरला अगोदर मुंबई इंडियन्सनं पराभूत केलं होतं. तर, आता सनरायजर्स हैदराबादनं पराभूत केलं आहे. आता केकेआर या पराभवाच्या मालिकेला ब्रेक लावणार का ते पाहावं लागेल.  

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget