IPL 2024 Virat Kohli And Rinku Singh: केकेआरचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. रिंकू सिंग विराट कोहलीकडे नवीन बॅट मागत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. मात्र विराट कोहली रिंकू सिंगला बॅट देण्यास नकार दिला होता. पंरतु आरसीबी आणि केकेआरच्या सामन्यानंतर कोहलीने बॅट दिल्याची कबुली स्वत: रिंकूने दिली आहे.
विराट कोहलीने नवीन बॅट दिल्यानंतर रिंकू सिंग खूप आनंदी दिसत आहे. कारण अनेक दिवसांपासून तो कोहलीकडे बॅटची मागणी करत होता. रिंकूची इच्छा आता पूर्ण झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये रिंकूने सांगितले की त्याला विराट कोहलीकडून नवीन बॅट मिळाली आहे. तसेच नेटकरी देखील अखेर रिंकूला यश मिळाले, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
विराट कोहलीने रिंकू सिंगला एक बॅट दिली होती. आयपीएलदरम्यान फलंदाजी करताना रिंकू सिंगची ती बॅट तुटली. त्यानंतर तो कोहलीकडे नवीन बॅटची मागणी करत होता. केकेआरच्या कॅमेरामनने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. रिंकू कोहलीच्या आणखी दोन बॅट्सकडे पाहत आहे. हे पाहून कोहली थोडासा नाराज होऊन रिंकूला विचारतो की ती बॅट कुठे हरवली आणि तो त्याची दुसरी बॅट का मागतोय?, रिंकूने उत्तर देण्यापूर्वीच कोहली गंमतीने रिंकूला सांगतो की, जर त्याने दोन सामन्यांमध्ये रिंकूला बॅट दिल्या तर स्पर्धेच्या भविष्यातील सामन्यांमध्ये त्याला अडचणी येऊ शकतात. यावर भाई तुझी शपथ घेतो, पुन्हा बॅट तोडणार नाही, असं रिंकू सिंग बोलताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशली मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
रिंकू सिंगची आयपीएल 2024 मधील कामगिरी
रिंकूला फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही. आतापर्यंत त्याने आयपीएल 2024 मध्ये 7 सामने खेळले आहेत ज्यात त्याने फक्त 107 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 26 आहे. रिंकूने आतापर्यंत 7 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.
संबंधित बातम्या:
10 व्या स्थानावरुन प्ले ऑफच्या फेरीपर्यंत; आरसीबीचा पुढील मार्ग कसा असेल?, जाणून घ्या समीकरण!
Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम