IPL 2024 Royal Challengers Bengaluru Playoffs Chance: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2024 मधील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) दुसरा विजय नोंदवला. बंगळुरूने हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 35 धावांनी पराभव केला. या हंगामात हैदराबादने अनेक विक्रम मोडीत काढले. मात्र बंगळुरुविरुद्ध हैदराबादने निराशजनक कामगिरी केली.


हैदराबादविरुद्ध विजय मिळवूनही आरसीबीला काही मोठा फायदा झालेला नाही. आरसीबीचा संघ अजूनही गुणतालिकेत दहाव्याच क्रमांकावर आहे. टॉप-4 मध्ये पोहोचून प्ले ऑफच्या फेरीत स्थान मिळवलं आरसीबीसाठी आता सोपे राहिलेले नाही. बंगळुरूने या मोसमात 9 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 2 विजय मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आता संघाला आणखी 5 सामने खेळायचे आहेत. बंगळुरूने पुढील पाच सामने जिंकल्यास संघाचे एकूण 14 गुण होतील. मात्र, 14 गुणांसह प्ले ऑफमध्ये जाणे फार कठीण आहे. संघाला किमान 16 गुणांची आवश्यकता असेल. गेल्या हंगामातही आरसीबीचे 14 गुण होते, तेव्हाही आरसीबीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. 


...तर 14 गुणांसह आरसीबीचा संघ पात्र ठरले-


जर आरसीबीने उर्वरित सर्व सामने जिंकून 14 गुण मिळवले, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी 14 गुणांसह स्पर्धा पूर्ण करावी अशी आशा संघाला करावी लागेल. या सर्व संघांचेही 14 गुण झाले तर आरसीबी नेट रनरेटच्या आधारे टॉप-4 मध्ये पोहोचू शकेल. तथापि, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की जर आरसीबीने त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी एकही गमावला. तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य होईल. दुसरीकडे, हैदराबाद, लखनौ, चेन्नई, दिल्ली आणि गुजरात यापैकी कोणत्याही संघाला 16 गुण मिळाले तर आरसीबी थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. आता आरसीबीचा संघ या हंगामात पात्र ठरू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


सध्या गुणतालिकेची काय स्थिती?


आरसीबीच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 8 सामन्यात 7 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 14 गुण आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद आणि लखनौचा संघही 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर असून चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात आणि मुंबईचा संघ देखील 8 गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहे. पंजाचा संघ नवव्या क्रमांकावर असून पंजाबला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबीची देखील हिच अवस्था पाहायला मिळत आहे. आरसीबीचे सध्या 4 गुण आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. 


संबंधित बातम्या:


Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video


चेन्नई, दिल्ली, गुजरातमध्ये चुरस; टॉप 4 मध्ये कोण?, पाहा आयपीएलचे Latest Points Table


हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम