IPL 2024: Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru: सलग सहा पराभव पत्करल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दुसरा विजय मिळवला. आयपीएलमध्ये सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला बंगळुरुने ३५ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 206 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके झळकावली.


प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 206 धावा उभारल्यानंतर हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 171 धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला पहिल्याच षटकात ट्रॅविस हेडच्या रूपाने मोठा धक्का बसला. यानंतर बंगळुरूने ठरावीक अंतराने बळी घेत हैदराबादची दहाव्या षटकात 6 बाद 85 धावा अशी अवस्था केली. शाहबाझ अहमद, अभिषेक शर्मा आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी झुंजार फटकेबाजी केली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले नाही. 


हैदराबादच्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद मालकीण काव्य मारनचे (Kavya Maran) अनेक फोटो व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यानची एक रिॲक्शन देखील सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटिझन्स तिच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. काव्या मारन या सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराइजर्स हैदराबाद टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे. काव्या पहिल्यांदा 2018 मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याला क्रिकेट खूप आवडतं. 










कोण आहे काव्या मारन? 


काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते.


संबंधित बातम्या:


चेन्नई, दिल्ली, गुजरातमध्ये चुरस; टॉप 4 मध्ये कोण?, पाहा आयपीएलचे Latest Points Table


हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम