IPL 2024 Latest Points Table: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 35 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 206 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके झळकावली. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाने 50 धावांच्या मोबदल्यात 3 मोठे विकेट्स गमावले. 


ट्रॅव्हिस हेडला आरसीबीविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. हेडने फक्त 1 धाव केली. तर अभिषेक शर्माने सुरुवात केली, पण संघाला चांगल्या स्थितीत आणता आले नाही. अभिषेकने 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 31 धावा केल्या. हैदराबादचे फलंदाज विशेषत: फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले. आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांनी या डावात 5 बळी घेतले. हैदराबादसाठी शाहबाज अहमदने 37 चेंडूत 40 धावांची खेळी खेळली, परंतु 19व्या षटकात मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांच्या तगड्या गोलंदाजीमुळे आरसीबीचा 35 धावांनी विजय निश्चित झाला.


आरसीबीच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 8 सामन्यात 7 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 14 गुण आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद आणि लखनौचा संघही 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर असून चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात आणि मुंबईचा संघ देखील 8 गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहे. पंजाचा संघ नवव्या क्रमांकावर असून पंजाबला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबीची देखील हिच अवस्था पाहायला मिळत आहे. आरसीबीचे सध्या 4 गुण आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. 






आरसीबीचा हैदराबादवर विजय-


सलग सहा पराभव पत्करल्यानंतर बंगळुरूने आपला दुसरा विजय मिळवताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हैदराबादला 35 धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 206 धावा उभारल्यानंतर हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 171 धावांवर रोखले.


संबंधित बातम्या:


विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा


RCB Dinesh Karthik: मी सर्वकाही करण्यास तयार...; दिनेश कार्तिकने आगरकर, द्रविड अन् रोहितच्या कोर्टात टाकला चेंडू, निवड होणार?