IPL 2024 SRH vs RR: आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधील प्रवास इथेच संपला.
हैदराबादच्या विजयानंतर संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) विजयाचे श्रेय प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीला (Dan Vettori) दिले. कठीण परिस्थिती असताना डॅनियल व्हेटोरीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण खेळ बदलला असं पॅट कमिन्सने सामन्यानंतर सांगितले. दरम्यान, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीआधी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदातान उतरलेल्या शाहबाज अहमदला गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली. पॅट कमिन्सच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र हा निर्णय हैदराबादसाठी चांगला ठरला.
पॅट कमिन्स नेमकं काय म्हणाला?
पॅट कमिन्स म्हणाला की, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीआधी शाहबाज अहमदला गोलंदाजी देण्याचा मास्टरस्ट्रोक डॅनियल व्हेटोरीचा होता. या निर्णयाने संपूर्ण सामना फिरला. शाहबाद अहमदने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. यामध्ये यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि रविचंद्रन अश्विनच्या विकेट्सचा समावेश होता. राजस्थानच्या संघात उजव्या हाताने फलंदाजी करणारे जास्त खेळाडू होता. याचकारणामुळे आम्ही डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूला गोलंदाजी दिली.
राजस्थानचा डाव कसा होता?
176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही 11 चेंडूत फक्त 10 धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग 10 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने 160 च्या स्ट्राईक रेटने शेवटपर्यंत झुंज दिली. जुरेल याने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली.