ICC T 20 World Cup 2024: आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
आगामी 2 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T 20 World Cup 2024) स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ आज किंवा उद्या विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याचा विचार केल्यास कोलकाता आणि हैदराबादच्या संघात कोणताही भारतीय खेळाडू नाही, ज्याचा विश्वचषकाच्या संघात देखील समावेश असेल. विश्वचषकाच्या संघात मुंबई इंडियन्सचे 4 खेळाडू, राजस्थान रॉयल्सचे 3, दिल्ली कॅपिटल्सचे 3, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 2, चेन्नई सुपर किंग्सचे 2 आणि पंजाब किंग्स संघातील एका खेळाडूचा समावेश आहे.
पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी-
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स), यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स), विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स), हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स), ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स), शिवम दुबे (चेन्नई सुपर किंग्स), रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स), संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स), युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स), कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स), मोहम्मद सिराज (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स), जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स), अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स)
विश्वचषकासाठी भारतीय खेळाडूंचा 15 सदस्यीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हर्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
राखीव खेळाडू-
शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात 20 संघ -
टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघाचा सहभाग झाला आहे. 2007 पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पण हा इतिहासातील सर्वात मोठा टी20 विश्वचषक असेल. त्यामुळे सुरक्षेचीही सर्व काळजी घेण्यात येईल. आधापासूनच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.