नवी दिल्ली : आयपीएलमधील (IPL 2024) 35 वी मॅच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यामध्ये पार पडली. सनरायजर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 266 धावा केल्या होत्या. हैदराबादनं दिलेलं 266 आव्हान पूर्ण करताना दिल्लीचा संघ 20 व्या ओव्हरमध्ये 199 धावांवर बाद झाला. हैदराबाद आणि दिल्लीच्या फलंदाजांनी आज चौकार षटकारांचा पाऊस पाडला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळं तो चुकीचा ठरला.  ट्रेविस हेडनं 89 धावा केल्या तर अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) 46 धावा केल्या. ट्रेविस हेडनं 16 बॉलमध्येच अर्धशतक झळकवलं. त्यामुळं त्याची अधिक चर्चा होईल मात्र, त्याचवेळी 46 धावांची खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माची बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची ठरली.


अभिषेक शर्माची वादळी खेळी


सननरायजर्स हैदराबादनं आज यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा दोनशेपेक्षा अधिक धावा केल्या. या धावसंख्येचा पाया ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं रचला होता. दोन्ही फलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादसाठी 131 धावांची सलामीची भागिदारी केली. याचं डावात त्यांनी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम देखील नावावर केला. हैदराबादनं 6 ओवरमध्ये 125 धावा केल्या. यामध्ये अभिषेक शर्माच्या 40 धावांचा समावेश होता तर ट्रेविस हेडनं 84 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मानं 12 बॉलमध्ये 46 धावा केल्या. 


अभिषेक शर्मानं 12 बॉलमध्ये 46 धावा केल्या यामध्ये त्यानं 6 सिक्स मारले आणि दोन चौकार मारले. अभिषेक शर्मानं केवळ 12 बॉलमध्ये 46 धावा 383.33 च्या स्ट्राइक रेटनं केल्या. 


अभिषेक शर्माच्या वादळी खेळीचं स्वरुप कसं होतं?


पहिला बॉल : खलील अहमदनला पहिल्या ओवरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावला.


दुसरा बॉल : दुसऱ्या ओवरच्या शेवटच्या बॉलवर ललित यादवला षटकार मारला.


तिसरा बॉल : चौथ्या ओव्हरमधील चौथा बॉल ललित यादवला षटकार मारला. 


चौथा बॉल : एक रन


पाचवा बॉल : ललित यादवला आणखी एक सिक्स मारला


सहावा बॉल : पुन्हा एक रन


सातवा बॉल :  कुलदीप यादवला सिक्स मारला


आठवा बॉल : कुलदीप यादवला पुन्हा सिक्स


नववा बॉल : एक रन काढून  ट्रेविस हेडला स्ट्राइक दिली. 


दहावा बॉल : पुन्हा एकदा कुलदीप यादवला सिक्स मारला. 
 
अकरावा बॉल : या बॉलवर देखील अभिषेक शर्मानं सिक्स मारला


बारावा बॉल : अभिषेक शर्मा आऊट झाला.


संबंधित बातम्या :


IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले


IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!