नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज ट्रेविस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माचं (Abhishek Sharma) वादळ पाहायला मिळालं. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन रिषभ पंतनं (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा हा निर्णय सन रायजर्स हैदराबादच्या (Sun Risers Hyderabad) ओपनर्सनी चुकीचा ठरवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं वादळी खेळी करत हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं सहा ओव्हरमध्ये 125 धावा करत इतिहास रचला. पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या हैदराबादच्या नावावर नोंदवली गेली. यापूर्वी पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या 105 इतकी होती. कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेन आणि लायनच्या पॉवरप्लेमधील 105 धावांचं रेकॉर्ड ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं मोडलं. आरसीबी विरुद्ध सुनील नरेननं 54 तर लायननं 49 धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं पॉवरप्लेमध्ये 125 धावा केल्या. यामध्ये ट्रेविस हेडनं 84 धावा केल्या. दुसरीकडे अभिषेक शर्मानं देखील 40 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या बॉलर्सची अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं धुलाई केली. खलील अहमदनं एका ओव्हरमध्ये 19 धावा,ललित यादवनं दोन ओव्हर्समध्ये 41 धावा, नॉर्खियानं एका ओव्हरमध्ये 22 धावा, कुलदीप यादवनं 20 तर मुकेश कुमारनं 22 धावा दिल्या.
पॉवरप्लेनंतर दिल्लीचं डॅमेज कंट्रोल
पॉवरप्लेनंतर दिल्ली कॅपिटल्सनं कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर कुलदीप यादवनं हैदराबदच्या धावसंख्येची गती कमी केली. कुलदीप यादवनं अभिषेक शर्माला 46 धावांवर बाद केलं. यानंतर फलंदाजीला आलेला मार्क्रम देखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. तो एक रन करुन बाद झाला. कुलदीप यादवच्या बॉलिंगवरच ट्रेविस हेड बाद झाला. यानंतर अक्षर पटेलनं हेनरिक क्लासेनला देखील बाद केलं.
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची शतकी भागिदारी
हैदराबादच्या डावाची सुरुवात करणाऱ्या ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दिल्लीच्या बॉलर्सला पॉवर प्लेमध्ये कमबॅक करुन दिलं नाही. सातव्या ओव्हरमध्ये हैदराबादला पहिला धक्का बसला. कुलदीप यादवनं अभिषेक शर्माला 46 धावांवर बाद केलं. अभिषेक शर्मानं 6 सिक्स आणि दोन चौकार मारले. ट्रेविस हेडनं 32 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 11 चौकार मारले.
नितीश कुमार रेड्डी आणि शाहबाजची अर्धशतकी भागिदारी
हेनरिक क्लासेन 15 धावा करुन बाद झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या 4 बाद 154 अशी होती. यानंतर नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाजनं अर्धशतकी भागिदारी करुन हैदराबादला 15 व्या ओव्हरमध्येच 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.
संबंधित बातम्या :
IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले