नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियमवर आज चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय. सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) पहिल्यांदा फलंदाजी करतना 7 बाद 266 धावा केल्या. हैदराबादसाठी ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाझ अहमद यांनी षटकारांची आतिषबाजी केली. 266 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये इम्पॅक्ट प्लेअर पृथ्वी शॉ 16 धावा करुन बाद झाला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Captials) आक्रमक फलंदाजीची जबाबदारी जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं (Jake Fraser McGurk) घेतली. त्यानं सनरायजर्स हैदराबादच्या बॉलर्सची धुलाई केली. ट्रेविस हेडनं सनरायजर्स हैदराबादसाठी 16 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं. तर, जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
जॅक फ्रेजर मॅक्गर्कचं दिल्लीसाठी वेगवान अर्धशतक
जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक वेगवान अर्धशतक केलं. मॅक्गर्कनं 15 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. मॅक्गर्कचं हे आयपीएलमधील तिसरं वेगवान अर्धशतक ठरलं आहे. यानंतर आक्रमक फलंदाजी करत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मॅक्गर्क बाद झाला. मॅक्गर्कनं 18 बॉलमध्ये 65 धावा केल्या यामध्ये त्यानं 7 सिक्स आणि 5 चौकारांच्या जोरावर 65 धावा केल्या.
यशस्वी जयस्वालनं सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. त्यानं 13 बॉलमध्ये अर्धशतक 2023 मध्ये पूर्ण केलं होतं. त्यानंतर केएल. राहुलनं 14 बॉलमध्ये अर्धशतक 2018 मध्ये पूर्ण केलं होतं. तर पॅट कमिन्सनं 2022 मध्ये 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं.
दिल्लीसाठी मॅक्गर्कनं 15 धावांमध्ये वेगवान अर्धशतक केलं आहे. यापूर्वी क्रिस मॉरिसनं 17 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. पृथ्वी शॉनं 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.रिषभ पंतनं मुंबई इंडियन्स विरुद्ध 18 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या. जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध देखील चांगली फलंदाजी केली होती. मॅक्गर्क बाद झाल्यानंतर दिल्लीला धावसंख्येचा वेग कायम राखता आला नाही.
अभिषेक पोरेल वगळता दिल्ली कॅपिटल्सच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. आजच्या मॅचमध्ये पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर देखील मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला, त्यानं 1 रन केली. ट्रिस्टन स्टब्स 10 धावांवर बाद झाला.
ट्रेविस हेडचं रेकॉर्ड मोडलं
सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना आजच्याच मॅचमध्ये ट्रेविस हेडनं 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. आस्ट्रेलियाचाच फलंदाज असलेल्या जॅक फ्रेजर मॅक्गर्गनं 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं यापूर्वीच्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला होता. आजच्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं ठेवलेलं 266 धावांचं आव्हान दिल्ली पूर्ण करु शकणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :
IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!
IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले