चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2024) 46 व्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात सुरु आहे. चेन्नई आणि हैदराबाद चेपॉकवर आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं 98 धावा केल्या. तर, डॅरिल मिशेलं 52 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादसाठी आक्रमक खेळी करणाऱ्या सलामीवीरांना तुषार देशपांडेनं बाद केलं. तुषार देशपांडेनं हैदराबादला तीन धक्के देत त्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला
चेन्नई सुपर किंग्जला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे. मराठमोळ्या तुषार देशपांडेनं हैदराबादला दुसऱ्या ओव्हरमध्येच दोन धक्के दिले. ट्रेविस हेडला 13 धावांवर तुषार देशपांडेनं बाद केलं. यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंगला तुषार देशपांडेनं शुन्यावर आऊट केला. यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेनं पुन्हा एकदा हैदराबादला धक्का देत अभिषेक शर्माला 15 धावांवर बाद केलं. चेन्नई सुपर किंग्जचा बॉलर तुषार देशपांडेनं सनरायजर्स हैदराबादला सुरुंग लावला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगला तुषार देशपांडेनं बाद करुन हैदराबादला डावाच्या सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं.
पाहा व्हिडीओ
ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं
चेन्नई सुपर किंग्जनं होमग्राऊंड असलेल्या चेपॉकवर पहिल्यांदा फलंदाजी करताना 212 धावा केल्या. चेन्नईकडून सर्वाधिक धावा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं केल्या. त्यानं 98 धावांची खेळी केली. ऋतुराज शिवाय डॅरिल मिशेलनं 52 आणि शिवम दुबेनं 39 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड 20 व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जला यापूर्वी चेपॉकवर झालेल्या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला देखील त्यांच्या होम ग्राऊंडवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आज विजयाच्या ट्रॅकवर कोण परतणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या: