CSK vs SRH Live Score IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जचा दणदणीत विजय, सनरायजर्स हैदराबाद 78 धावांनी पराभूत

CSK vs SRH Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज सनरायडर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत.आयपीएलमधील ही 46 वी लढत आहे.

युवराज जाधव Last Updated: 28 Apr 2024 11:35 PM
चेन्नई एक्स्प्रेस विजयाच्या ट्रॅकवर परतली, ऋतुराज गायकवाड - तुषार देशपांडेची दमदार कामगिरी, हैदराबादवर दणदणीत विजय

IPL 2024 :  आयपीएलच्या 46 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी विजय मिळवला आहे.

हैदराबादला नववा धक्का, शाहबाज 7 धावांवर बाद

हैदराबादला नववा धक्का बसला असून शाहबाज 7 धावांवर बाद झाला आहे.

सनरायजर्स हैदराबादला 8 वा धक्का, पॅट कमिन्स पाच धावांवर बाद

सनरायजर्स हैदराबादला 8 वा धक्का बसला असून पॅट कमिन्स पाच धावांवर बाद झाला.

सनरायजर्स हैदराबादला 7 वा धक्का, अब्दुल समद बाद

सनरायजर्स हैदराबादला अब्दुल समदाच्या रुपानं सातवा धक्का बसला. शार्दूल ठाकूरनं त्याला 19 धावांवर बाद केलं. 

पथिरानाचा हैदराबादला दुसरा धक्का, क्लासेन 20 धावांवर बाद

हेनरिक क्लासेन 20 धावांवर बाद झाला.  मथिशा पथिरानानं त्याला बाद केलं.   

हैदराबादच्या 100 धावा पूर्ण

सनरायजर्स हैदराबादनं 13 व्या ओव्हरमध्ये शंभर धावा पूर्ण केल्या. मार्क्रमनं सर्वाधिक 32 धावा केल्या. 

चेन्नईचा हैदराबादला पाचवा धक्का, पथिरानाचा भन्नाट यॉर्कर, मार्क्रमच्या दांड्या गुल

चेन्नई सुपर किंग्जचा बॉलर पथिरानानं भन्नाट यॉर्कर टाकत हैदराबादच्या मार्क्रमला 32 धावांवर बाद केलं. 

नितीशकुमार रेड्डी बाद, हैदराबादला चौथा धक्का

रवींद्र जडेजानं सनरायजर्स हैदराबादला चौथा धक्का दिला आहे. नितीशकुमार रेड्डी 15 धावा करुन बाद झाला आहे. 

चेन्नई सुपर किंग्जकडून हैदराबादला तीन धक्के, तुषार देशपांडेचा धमाका

चेन्नई सुपर किंग्जचा बॉलर तुषार देशपांडेनं सनरायजर्स हैदराबादला सुरुंग लावला आहे. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंगला तुषार देशपांडेनं बाद केलं. 

चेन्नई सुपर किंग्जच्या 212 धावा

चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 212  धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं 98, डॅरिल मिशेलनं 52 आणि शिवम दुबेनं 39 धावांची खेळी केली.  

चेन्नईला तिसरा धक्का, ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं

ऋतुराज गायकवाडनं आज देखील दमदार खेळी केली. 98 धावांवर खेळत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला अन् त्याचं शतक हुकलं. 

ऋतुराज गायकवाड शतकाच्या उंबरठ्यावर

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड शतकाच्या उंबरठ्यावर आहे. लखनौ विरुद्ध देखील त्यानं शतक झळकावलं होतं. 

डॅरिल मिशेलचं अर्धशतक

डॅरिल मिशेलनं अर्धशतकी खळी केली आहे.  ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेलनं डाव सावरला आहे. 

ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक, चेन्नई सुपर किंग्जचा डाव सावरला

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड यानं अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. 

चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का, अजिंक्य रहाणे 9 धावांवर बाद

अजिंक्य रहाणे आज देखील मोठी खेळी करु शकला नाही. अजिंक्य रहाणे 9 धावांवर बाद झाला. 

SRH vs CSK : सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय

सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं आज देखील टॉस गमावला. 

चेन्नई सुपर किंग्जला धोनी मॅजिकची आशा

चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयासह केली होती. मात्र, नंतर त्यांना कामगिरीत सातत्य ठेवता आलं नव्हतं. चेन्नईनं आतापर्यंत चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 

सनरायजर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर

सनरायजर्स हैदराबादनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच मॅच जिंकल्या आहेत. गुणतालिकेत ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

चेन्नई गुणतालिकेत पाचव्या स्थानावर

चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून त्यांनी चार मॅचमधील विजयासह 8 गुण त्यांच्या नावावर आहेत. 

CSK vs SRH Live : चेन्नईला प्ले ऑफमधील एंट्रीसाठी विजय आवश्यक

चेन्नई सुपर किंग्जला आजच्या मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीत सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवावा लागेल. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. 

पार्श्वभूमी

SRH vs CSK, IPL 2024 Sun Risers Hyderabad vs Chennai Super Kings Live : आयपीएलमध्ये आज पॅट कमिन्सच्या नेतृ्त्त्वातील सन रायजर्स हैदराबाद आणि ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 45 वी लढत आहे. हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला आरसीबीनं पराभूत केलं होतं. त्या पराभवातून धडा घेत हैदराबाद पलटवार करण्याची शक्यता आहे. सनरायजर्स हैदराबाद 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, चेन्नई पाचव्या स्थानावर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.