अहमदाबाद : आयपीएलची (IPL 2024) 45 वी मॅच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात पार पडली.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला.  आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं (Faf du Plessis) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेत गुजरात टायटन्सला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावलं. गुजरात टायटन्सनं साई सुदर्शन आणि शाहरुख खानच्या खेळीच्या जोरावर 200 धावा केल्या होत्या. आरसीबीनं या धावांचा पाठलाग यशस्वीपणे केल. विराट कोहली (Virat Kohli)  आणि विल जॅक्सनं (Will Jacks) 150 हून अधिक धावांची भागिदारी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. विल जॅक्सनं महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं सिक्स मारत आरसीबीला विजय मिळवून दिला आणि शतक देखील पूर्ण केलं. 


विल जॅक्सचं शतक 


गुजरात टायटन्सनं दिलेलं 200 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 16 ओव्हरमध्येच पार केलं.  विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, फाफ डु प्लेसिस 24 धावांवर बाद झाला. विराट कोहलीनं फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर विल जॅक्ससोबत भागिदारी करुन संघाला विजय मिळवून दिला. विल जॅक्सनं 41 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली.  विल जॅक्सनं षटकार मारत शतक पूर्ण केलं त्याच बरोबर संघाला विजय मिळवून दिला.  विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. 


गुजरातचा होम ग्राऊंडवर पराभव 


गुजरात टायटन्सचा होम ग्राऊंडवर आणखी एक पराभव झाला आहे. गुजरात टायटन्सनं  पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या.  गुजरातचे सलामीवर रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल आज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. रिद्धिमान साहानं 5 तर शुभमन गिलनं 16 धावा केल्या. यानंतर गुजरातचा डाव साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी सावरला. साई सुदर्शननं 84 धावा केल्या तर शाहरु खाननं 58 धावा केल्या. शाहरुख खान बाद झाल्यानंतर साई सुदर्शन यानं डेव्हिड मिलरच्या साथीनं संघाला 20 ओव्हरमध्ये 200 धावांपर्यंत पोहोचवलं. मात्र, गुजरात टायटन्सचे गोलंदाज ही धावसंख्या वाचवू शकले नाहीत. 


आरसीबीचा सलग दुसरा विजय 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी यंदाचं आयपीएल निराशाजनक ठरलं आहे. मात्र, यापूर्वीच्या मॅचमध्ये त्यांनी सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं होतं. आज आरसीबीनं गुजरात टायटन्सला 9 विकेटनं पराभूत केलं. आरसीबीनं सलग दुसरा विजय मिळवला असला तर ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत. 


संबंधित बातम्या :


PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई


Glenn Maxwell : कमबॅक करताच कॅप्टननं विश्वास टाकला, ग्लेन मॅक्सवेलं करुन दाखवलं, थेट शुभमन गिलला दणका, Video