अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) विल जॅक्स आणि विराट कोहलीनं दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विल जॅक्सनं 41 धावांमध्ये शंभर धावांची खेळी केली. तर, विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 केल्या. विल जॅक्सनं यंदाच्या आयपीएलमधील त्याचं पहिलं शतक झळकावलं. विल जॅक्सनं महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
विल जॅक्सनं 21 बॉलमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली. विल जॅक्सनं 41 बॉलमध्ये 10 षटकार आणि 5 चौकार मारले. विल जॅक्सनं शतकी खेळी करत संघाला 16 ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.
गुजरातच्या प्रमुख गोलंदाजांची धुलाई
गुजरात टायटन्सचे प्रमुख गोलंदाज मोहित शर्मा आणि राशिद खानच्या बॉलिंगवर विल जॅक्सनं जोरदार प्रहार केला. मोहित शर्मानं टाकलेल्या 15 व्या ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. नो बॉलची एक रन वगळता विल जॅक्सनं 28 धावा केल्या. यानंतरच्या ओव्हरमध्ये राशिद खानच्या ओव्हरमध्ये देखील चौकार षटकार मारले. विल जॅक्सनं राशिद खानला चार सिक्स आणि एक चौकार मारत शतक पूर्ण केलं. विल जॅक्सनं 6,6,4,6,6 अशी धुलाई राशिद खानची केली.
विल जॅक्सनं 31 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर विल जॅक्सनं शतकापर्यंतची वाटचाल पुढच्या 10 बॉलमध्ये पूर्ण केली.
विराट कोहलीसोबत फलंदाजी करणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. त्याच्यासोबत मैदानावर फलंदाजी करणं आनंददायी असतं. विराट कोहलीनं पहिला सिक्स मारण्यासाठी विश्वास दिला, असं विल जॅक्स म्हणाला.
विराट कोहली आणि विल जॅक्सच्या वादळापुढं गुजरातची धुळदाण
गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 200 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं एका बाजूनं जोरदार फलंदाजी सुरु ठेवली होती. त्याला योग्यवेळी विल जॅक्सची साथ मिळाली. विराट कोहलीनं 44 धावांमध्ये 70 धावांची खेळी केली. फाफ डु प्लेसिसनं 24 धावा केल्या. यानंतर विल जॅक्सनं वादळी खेळी केली. त्यानं 31 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या 10 बॉलमध्येच शंभर धावांपर्यंत मजल मारली. विराट आणि जॅक्सनं आरसीबीला 16 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.
बंगळुरुचा तिसरा विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला आहे. आरसीबीच्या नावावर आता तीन विजयांसह सहा गुण आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा होम ग्राऊंडवर आणखी एक पराभव झाला आहे.
संबंधित बातम्या