GT vs RCB IPL 2024  : आयपीएलमधील 45 व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने आले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही मॅच सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन फाफ  डु प्लेसिसनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची सुरुवात धिम्या गतीनं झाली.  गुजरातला पॉवर प्लेमध्ये एका विकेटवर 42 धावा करता आल्या. पॉवर प्लेनंतर फाफ डु प्लेसिसनं बॉलिंग कमबॅक करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला बॉलिंग दिली. याचा फायदा घेतल मॅक्सवेलनं गुजरातला दुसरा धक्का दिला. 


ग्लेन मॅक्सवेलनं टाकलेल्या सातव्या ओवरच्या चौथ्या बॉलवर शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिलनं  ग्लेन मॅक्सवेलनं टाकलेला बॉल लाँग ऑनच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभमन गिल कमनशिबी ठरला. कॅमेरुन ग्रीननं कॅच घेतल्यानं शुभमन गिलला 16 धावांवर माघारी जावं लागलं. शुभमन गिलनं 19 बॉलमध्ये 16 धावा केल्या. गुजरात टायटन्सचा दुसरा सलामीवीर रिद्धिमान साहा देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. तो केवळ 5 धावा करुन बाद झाला.







आरसीबीकडून गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं कमबॅक केलं आहे. काही दिवसांपासून तो संघाबाहेर होता. गुजरात टायटन्सनं आतापर्यंत 9 मॅच खेळल्या असून त्यापैकी चार मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला तर पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. दोनवेळा त्यांना दिल्लीनं पराभूत केलं होतं. 


दुसरीकडे फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 9 मॅचपैकी केवळ 2 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, त्यांना सात मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.दोन विजयांसह आरसीबी गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. तर, गुजरात टायटन्स सातव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गेल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत केल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.   


आरसीबी आणि गुजरात साठी करो या मरो


गुणतालिकेत गुजरात टायटन्स सातव्या स्थानावर आहे तर आरसीबी दहाव्या स्थानावर आहे.  प्लेऑफमधील प्रवेशाचा आशा जिवंत ठेवायच्या असल्यास दोन्ही संघांना आजची मॅच जिंकणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या :


IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?


 IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?