नवी दिल्ली : आयपीएलमध्ये काल नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने सामने आले होते. दिल्ली कॅपिटल्सनं20 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. 17 व्या ओव्हरपर्यंत राजस्थानच्या हातात असलेली मॅच दिल्लीनं खेचून आणली. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 221 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं 8 विकेटवर 201 धावा केल्या. दिल्लीनं यंदाच्या आयपीएलमधील सहावा विजय मिळवत प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यानं पराभवानंतर दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट कुलदीप यादव, जॅक फ्रेजर मॅक्गर्क यांना न देता ट्रिस्टन स्टब्सला दिलं. 


राजस्थान रॉयल्सची मॅचवर 17 व्या ओव्हरपर्यंत पकड होती. राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 63 धावांची गरज असताना दिल्लीचे बॉलर्स दबावात होते. मात्र, त्यानंतर पुढील पाच ओव्हरमध्ये राजस्थाननं 5 विकेट गमावून 41 धावा केल्या, यामुळं त्यांना 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 


संजू सॅमसन यानं मॅचनंतर बोलताना म्हटलं की मॅच आमच्या हातात होती. संजू म्हणाला मॅच आमच्या हातात होती, 11-12 रन प्रति ओव्हरमध्ये करुन विजय मिळवता आला असता.  मात्र, आयपीएलमध्ये अशा गोष्टी होत असतात. आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. 220 धावांचं टार्गेट 10 धावांनी जास्त होतं. आम्ही चौकार आणि षटकार कमी प्रमाणात दिले असते तर मॅच जिंकली असती, असं संजू सॅमसन म्हणाला.


संजू सॅमसननं राजस्थानच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर देखील आपल्या टीमचं कौतुक केलं. आम्ही विजयाच्या जवळ जाऊन मॅच गमावल्या आहेत. आम्ही तीन मॅचमध्ये पराभूत झालो आहोत. मात्र, विजयाच्या जवळ जाऊन पराभूत झालोय. आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. आम्हाला त्याद्वारे कमबॅक करावं लागणार आहे. आम्ही मॅच गमावल्या आहेत पण त्या कुठं गमावल्या याचा अभ्यास करुन पुढं जावं लागेल, असं संजू म्हणाला.


संजूनं दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट कुणाला दिलं?


संजू सॅमसन म्हणाला की दिल्लीसाठी जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं जोरदार फलंदाजी केली तर फिनिशिंग टच ट्रिस्टन स्टब्सनं दिला. मॅक्गर्कनं आयपीएलमध्ये यापूर्वी जे केलं तेच केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट ट्रिस्टन स्टब्सला द्यावं लागेल. स्टब्सनं युजवेंद्र चहल आणि संदीप शर्माला मोठे फटके मारले, असं संजू सॅमसन म्हणाला.


संबंधित बातम्या :


VIDEO : संजू सॅमसनसोबत चिडीचा डाव, त्या वादग्रस्त झेलनंतर भरमैदानात गोंधळ


दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, राजस्थानचा 20 धावांनी पराभव, संजूची वादळी खेळी व्यर्थ