Sanju Samson : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन यानं वादळी 86 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याची विकेट पडल्यानंतरच दिल्लीने सामन्यात कमबॅक केले. संजू सॅमसनची विकेट सध्या चर्चेत आहे. संजू सॅमसन खरेच बाद होता का? संजू सॅमसन याला बाद दिलेल्या पंचाच्या निर्णायावरुन सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. तिसऱ्या पंचाच्या निर्णायावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचांनी बाद दिलेल्यानंतर भरमैदानात आणि मैदानाबाहेरही गोंधळ पाहायला मिळाला. संजू सॅमसन यानेही पंचाकडे आपली नाराजी व्यक्त केली.
संजू सॅमसनचे शतक हुकले -
दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. यशस्वी जायस्वाल पहिल्याच षटकात तंबूत परतला. पण त्यानंतर संजू सॅमसन यानं सामन्याची सुत्रे हातात घेतली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन याने वादळी फलंदाजी केली. संजू सॅमसन याचं शतक थोडक्यात हुकलं. संजू 86 धावांवर बाद झाला. त्याचा सिमारेषावर शाय होप यानं झेल घेतला. यावरुनच वाद झाला. याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. संजू सॅमसन यानं राजस्थानकडून एकाकी झुंज दिली. संजू सॅमसन यानं 86 धावांची झंझावती खेळी केली. संज सॅमसन यानं 46 चेंडूमध्ये 86 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. संजू सॅमसन यानं यंदाच्या हंगामातील 400 धावांचा पल्ला पार केला.
तिसऱ्या पंचानं संजूसोबत चिडीचा डाव टाकला
सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचला होता. संजू सॅमसनचा जम बसला होता. दिल्लीकडून 16 वे षटक मुकेश कुमार घेऊन आला. मुकेश कुमारच्या चेंडूवर संजू सॅमसन यानं मोठा फटका मारला. सिमारेषावर असणाऱ्या शाय होप यानं झेल घेतला. पण त्यावेळी त्याचा पाय सिमारेषाला लागला की नाही.. हे मैदानावरील पंचाला समजलं नाही. त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी संजू सॅमसन बाद असल्याचा निर्णय घेतला. पण व्हिडीओत शाय होप याचा पाय सिमारेषाला लागल्याचं दिसत होतं. समालोचक सिद्धू यांच्यामतेही संजू सॅमसन नाबाद होता. पंचाने चुकीचा निर्णय दिला, असे सिद्धू म्हणाला.
तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर संजू सॅमसन यालाही विश्वास बसला नाही. राजस्थानच्या ताफ्यातही नाराजी होती. संजू सॅमसन यानं मैदानावरील पंचासोबत चर्चा केली. यावेळी मैदानावर गोंधळ झाला होता. संजू सॅमसन याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. संजू सॅमसन याला बाद दिल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. अनेकांनी या निर्णायाचा विरोध दर्शवला. इरफान पठाण आणि नवज्योत सिद्धू यांनीही याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.