DC vs RR IPL 2024 : संजू सॅमसन याच्या वादळी अर्धशतकानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने राजस्थानचा पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला 201 धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅसमन यानं एकाकी झुंज दिली. संजूने 86 धावांची वादळी खेळी केली. दिल्लीकडून कुलदीप यादव यानं मोक्याच्या क्षणी भेदक मारा करत दोन फलंदाजांना तंबूत धाडलं.


दिल्लीची खराब सुरुवात


दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल पहिल्याच षटकात तंबूत परतला. यशस्वी जायस्वाल फक्त चार धावा काढून बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन यानं सुत्रे हातात घेतली, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. एकही फलंदाज फारकाळ टिकला नाही. राजस्थानच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. संजू सॅमसन यानं एकाकी झुंज दिली. 


संजू सॅमसनची एकाकी झुंज 


संजू सॅमसन यानं जोस बटलर याच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अक्षर पटेल यानं जोस बटलर याला त्रिफाळाचीत करत दिल्लीला मोठं यश मिळवून दिले. जोस बटलर याला 17 चेंडूमध्ये फक्त 19 धावा करता आल्या. तर रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानची धावसंख्या वाढवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारीही केली. पण रियान पराग यानं मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. रियान पराग यानं 22 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना संजूने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी केली. 


संजू सॅमसन यानं राजस्थानकडून एकाकी झुंज दिली. संजू सॅमसन यानं 86 धावांची झंझावती खेळी केली. संज सॅमसन यानं 46 चेंडूमध्ये 86 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. संजू सॅमसन यानं यंदाच्या हंगामातील 400 धावांचा पल्ला पार केला. संजू सॅमसन याच्या वादळी फलंदाजीनंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. 


राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली 


रियान पराग यानं तीन षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या. तर शुभम दुबे यानं 12 चेंडूत झंझावती 25 धावांचा पाऊस पाडला. संजू बाद झाल्यानंतर दुबे याने धावसंख्या वाढवली, पण मोक्याच्या क्षणी दुबे बाद झाला.दुबेने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. रोवमन पॉवेल यानं अपेक्षाभंग केला. जम बसल्यानंतरही त्याला फटकेबाजी करता आली नाही. पॉवेल याला 10 चेंडूमध्ये फक्त 13 धावा काढता आल्या. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकता आला. डेनवो फेरारिया याला पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त एका धावेवर बाद झाला. अश्विन फक्त दोन धावा काढून बाद झाला. आवेश खान याने सात तर बोल्ट यानं दोन धावा काढल्या. 


कुलदीपचा भेदक मारा


दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आमि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रसीक सलाम आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. इशांत शर्माच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.