IPL 2024 Rinku Singh: आयपीएल 2024 रिंकू सिंगसाठी (Rinku Singh) काही खास नव्हते. मात्र, असे असतानाही कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) विजेतेपद पटकावले. त्याचवेळी रिंकू सिंगला आयपीएलमधील सततच्या खराब फॉर्मचा फटका सहन करावा लागला. वास्तविक, रिंकू सिंगला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, या धडाकेबाज फलंदाजाला निश्चितच राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. कोलकाताने आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर आणि टी-20 विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी रिंकू सिंगने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले.


देवाने जे काही दिले त्यात आनंदी राहावे...'


रिंकू सिंगला आयपीएलच्या मानधनाबाबत विचारले असता त्याने सांगितले की, हे 55 लाख रुपये माझ्यासाठी खूप आहेत, मी मोठा होत असताना 5 ते 10 रुपये कसे मिळतील याचा विचार करायचो, पण आता माझा आयपीएलचा पगार 55 लाख आहे, जो माझ्या मते खूप जास्त आहे. माझा विश्वास आहे की देव जे काही देतो त्यात आनंदी राहावे. कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सिंगला अवघ्या 55 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. रिंकू सिंगची किंमत करोडोंमध्ये असावी असे क्रिकेट दिग्गज आणि चाहत्यांना वाटते. 


रोहित शर्मा युवा खेळाडूंना खूप सपोर्ट करतो...'


याशिवाय रिंकू सिंगने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की रोहित शर्मा युवा खेळाडूंना खूप सपोर्ट करतो, रोहित शर्मा कर्णधार म्हणून किती हुशार आहे हे संपूर्ण जगाने पाहिले आहे... युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी अशी त्याची नेहमीच इच्छा असते. दरम्यान टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रोहित शर्मा या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तर अष्टपैलू हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.


केकेआरने पटकावलं आयपीएल 2024 चं जेतेपद-


दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवून किताब जिंकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने स्फोटक खेळी केली. केकेआरचा संघ सर्वप्रथम 2012 मध्ये आयपीएलचा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर 2014 आणि 2024 मध्ये त्यांना किताब जिंकण्यात यश आले. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एकदा आयपीएल जिंकली. 


विश्वचषकासाठी भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 


राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.


संबंधित बातम्या:


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर, काय म्हणाली?, पाहा Video


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्याचे वासे फिरले! पोटगी म्हणून नताशाला 70 टक्के संपत्ती देणार?, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण