IPL 2024 Royal Challengers Bengaluru: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 47 धावांनी पराभव करून IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बंगळुरुने प्रथम खेळताना 187 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये रजत पाटीदारच्या 52 धावांच्या अर्धशतकाचे महत्त्वपूर्ण योगदान होते. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला केवळ 140 धावा करता आल्या. बंगळुरुच्या या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे. बंगळुरुने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे, तर दिल्लीची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. आयपीएल 2024 च्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात बंगळुरुला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या 8 मधील 7 सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला.  पण आता असं काय झालं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गेल्या पाच सामन्यांपासून आक्रमक खेळत आहे. 


बंगळुरूने नशीब पालटले-


बंगळुरुकडून विराट कोहली सुरुवातीपासून सतत धावा करत होता, पण आता आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे. गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करता येत नव्हता, पण आता गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बंगळुरुचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसून येत आहे. गोलंदाजीमुळे बंगळुरू मोठ्या फरकाने सामने जिंकत आहे.


विराट कोहली जबरदस्त फॉर्मात-


आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून सुरुवातीपासूनच धावा येत आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली अव्वल आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यात 155.16 च्या स्ट्राईक रेटने 661 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतके आणि एका शतकाचाही समावेश आहे.


आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये सुधारणा-


या पाच जिंकलेल्या सामन्यांमध्ये आघाडीच्या फळीतील फलंदाजांनीही शानदार फलंदाजी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये रजत पाटीदार, विल जॅक्स आणि कॅमेरून ग्रीन यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. विल जॅक्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. फाफ डू प्लेसिसही आपल्या बॅटने धावा करत आहे.


गोलंदाजीत बदल दिसून आला-


गेल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. या पाच सामन्यांमध्ये असे दोनदा घडले आहे जेव्हा बेंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला ऑलआउट केले होते. 


बंगळुरुने शेवटचे पाच सामने मोठ्या फरकाने जिंकले


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. बेंगळुरूने हैदराबादवर 35 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 38 चेंडूत 4 गडी राखून विजय मिळवला. पंजाबविरुद्ध बेंगळुरूने 60 धावांनी विजय मिळवला होता आणि आता दिल्लीविरुद्ध बेंगळुरूने 47 धावांनी विजय मिळवला आहे.


संबंधित बातम्या:


चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video


Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video


IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!