कोलकाता : आयपीएलच्या 31 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) 2 विकेटनं पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला. राजस्थानच्या जोस बटलरनं (Jos Butler) नाबाद 107 धावांची खेळी करुन टीमला विजय मिळवून दिला. जोस बटलरनं राजस्थानला एकहाती मॅच जिंकवून दिली. मात्र, जोस बटलरसोबत आवेश खान (Avesh Khan) देखील नाबाद राहिला. विशेष बाब म्हणजे राजस्थानच्या युवा बॉलरला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्याच्या नावापुढं धावसंख्या शुन्य राहिली. हाच  संदर्भ घेत लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants ) आवेश खानबाबत भन्नाट ट्विट केलं आहे. याशिवाय राजस्थाननं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 


आवेश खान गेल्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटसकडून खेळत होता. यंदाच्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. आज राजस्थान रॉयल्सनं  कोलकाताला दोन विकेटनी पराभूत केलं. जोस बटलरनं शतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यावेळी दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी आलेल्या  आवेश खानला त्यानं स्ट्राईक दिली नाही. परिणामी एकही बॉल न खेळणाऱ्या आवेश खानला एकही रन करता आली नाही. मात्र, अखेरच्या तीन धावांमध्ये त्याचं योगदान महत्त्वाचं होतं.  






लखनौ सुपर जाएंटसनं कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील मॅचनंतर एक ट्विट केलं आहे. यामध्ये आवेश खानचा फोटो पोस्ट करण्यातआ ला आहे. राजस्थानकडून जोस बटलरनं आवेश खानच्या साथीनं 38 धावांची भागिदारी केली. मात्र, यामध्ये आवेश खानचं योगदान 0 बॉलमध्ये 0 धावा असं राहिलं. हाच धागा पकडत लखनौ सुपर जाएंटसनं आवेश खानचा एक जुना फोटो प्सट केला आहे. त्यामध्ये आवेश खानच्या 2023 च्या आयपीएलमधील कामगिरीचा  आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमधील आवेशच्या धावसंख्येचा फोटो पोस्ट केला आहे.  


आवेश खाननं 2023 मध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचमधील विजयानंतर मोठा जल्लोष केला होता. आवेश खाननं हेल्मेट फेकून दिलं होतं. आवेश खानला त्या कृतीमुळ दंड देखील झाला होता. 


राजस्थान कडूनही व्हिडिओ शेअर


राजस्थान रॉयल्सनं देखील आवेश खाननं खेळलेल्या बॉलचा आणि धावांचा उल्लेख करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. फिनिशर साहेब, असं  कॅप्शन देऊन राजस्थाननं तो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राजस्थानचे इतर खेळाडू आवेश खानचंस स्वागत करताना दिसून आले.  






संबंधित बातम्या : 


जोस बटलरनं एकहाती विजय मिळवून दिला पण जिंकण्याचा आत्मविश्वास कुणामुळं, संजूनं घेतलं वेगळं नाव


KKR vs RR : शाहरुखचा दिलदारपणा, पराभवाचं दु:ख विसरुन जोस बटलरचं कौतुक, मिठी मारत शतकी खेळीचं अभिनंदन ,पाहा व्हिडीओ