IPL 2024 PBKS vs CSK: चेन्नईचा पंजाबवर 28 धावांनी विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

IPL 2024 PBKS vs CSK: धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येतील.

मुकेश चव्हाण Last Updated: 05 May 2024 07:22 PM
चेन्नईचा पंजाबवर 28 धावांनी विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जवर 28 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा संघ गुणतालिकेत या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईनं पहिल्यांदा 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. तर, पंजाब किंग्जला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 139 धावा करता आल्या.

चेन्नईचा पंजाबवर 28 धावांनी विजय, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जवर 28 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा संघ गुणतालिकेत या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईनं पहिल्यांदा 9 विकेटवर 167 धावा केल्या होत्या. तर, पंजाब किंग्जला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 139 धावा करता आल्या.

चेन्नई विजयाच्या जवळ

चेन्नई सुपर किंग्जचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला आहे. पंजाबच्या  नऊ विकेट घेण्यात त्यांना यश आलंय.

चेन्नईचे पंजाबला धक्के सुरुच

पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात देखील चांगली झालेली नाही. पंजाबनं 10 ओव्हरमध्ये 5 बाद 72 धावा केल्या आहेत. 

पंजाब किंग्जला सुरुवातीला दोन धक्के

चेन्नईनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. जॉनी बेयरस्टो आणि आर. रुसो बाद झाले. चेन्नईच्या तुषार देशपांडेनं दोन विकेट घेतल्या.

पंजाब किंग्जला सुरुवातीला दोन धक्के

चेन्नईनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. जॉनी बेयरस्टो आणि आर. रुसो बाद झाले. चेन्नईच्या तुषार देशपांडेनं दोन विकेट घेतल्या.

पंजाब किंग्जनं चेन्नईला 167 धावांवर रोखलं

पंजाब किंग्जनं चेन्नईला 167 धावांवर रोखलं आहे.  चेन्नई सुपर किंग्जनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 167 धावा केल्या. 

राहुल चहरचा चेन्नईला तिसरा धक्का, मिशेल सँटनर बाद

पंजाब किंग्जचा बॉलर राहुल चहरनं चेन्नईची तिसरी विकेट घेतली. मिशेल सँटनरला त्यानं बाद केलं. 

चेन्नईला पाचवा धक्का, मोईन अली बाद

पंजाबचा कॅप्टन सॅम करननं चेन्नईचा फलंदाज मोईन अलीला बाद केलं. 

चेन्नई सुपर किंगजच्या 100 धावा पूर्ण

चेन्नई सुपर किंग्जनं 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 13 व्या ओव्हरमध्ये चेन्नईनं ही धावसंख्या गाठली.

डॅरिल मिशेल 30 धावांवर बाद, चेन्नईला चौथा धक्का

डॅरिल मिशेल 30 धावांवर असताना त्याला हर्षल पटेलनं एलबीडब्ल्यू आऊट करत चेन्नईला चौथा धक्का दिला.

चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन धक्के

आर. चहरनं चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन धक्के दिले. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे बाद झाले. ऋतुराज गायकवाड 32 धावांवर बाद झाला. शिवम दुबे शुन्यावर बाद झाला.

चेन्नई सुपर किंग्जचा डाव ऋतुराज गायकवाड अन् मिशेलनं सावरला

चेन्नई सुपर किंग्जचा डाव ऋतुराज गायकवाड  अन्  मिशेलनं सावरला  आहे. सहा ओव्हरमध्ये एक बाद 60 धावा केल्या आहेत.

चेन्नईला पहिला धक्का, अजिंक्य रहाणे 9 धावांवर बाद

चेन्नई सुपर किंग्ज पहिला धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणे 9 धावा करुन बाद झाला. 

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन-

जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग

चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेवन-

अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे, मिचेल सॅटनर

पंजाबचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

नाणेफेकत जिंकत पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.





गुणतालिकेची काय स्थिती?

काल झालेल्या सामन्यात गुजरातविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. आरसीबीने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. त्याचे 16 गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाताने 10 सामने खेळले असून 7 जिंकले आहेत. त्याचे 14 गुण आहेत. लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आहे. तर चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर आहे.

महान फुटबॉलपटूचं ट्विट

एम.एस.धोनीची चाहते काय म्हणताय?

पंजाब किंग्स सज्ज

एम.एस. धोनीची फटकेबाजी

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेवन-

अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन आणि मथिशा पाथिराना.

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

कोणत्या संघाचे वर्चस्व?

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स 29 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 15, तर पंजाब किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील अंतर फारसे नाही. मात्र या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन काय असेल?

चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रुतुराज गायकवाड असू शकतात. याशिवाय डेरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी हे फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तसेच गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन आणि मथिशा पाथिराना यांच्याकडे असेल.

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन काय असेल?

पंजाब किंग्सचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग असू शकतात. याशिवाय फलंदाजीची जबाबदारी रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा आणि सॅम कुरन यांच्यावर असेल. तसेच हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग हे गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.

धर्मशाळेतील हवामान कसे असेल?

आज धर्मशालामध्ये तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची शक्यता 60 टक्के आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, फक्त रिमझिम पावसाची शक्यता आहे, मुसळधार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ: 

अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, समीर रिझवी, मोईन अली, एमएस धोनी (w), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन

पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ: 

सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, विद्वत कवेरप्पा, अथर्व तायडे, शिवम सिंग, ऋषी धवन, जॉनी बेअरस्टो, नॅथन एलिस, तनय त्यागराजन, शिखर धवन, ख्रिस वोक्स, सिकंदर रझा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग

पार्श्वभूमी

IPL 2024 Punjab Kings vs Chennai Super Kings: आज आयपीएलचे दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे संघ आमनेसामने असतील. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येतील. त्याच वेळी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.