एक्स्प्लोर

IPL 2024 Playoffs : 4 दिवस, 5 संघ अन् 2 जागा... प्लेऑफचं समीकरण सोप्या भाषेत 

IPL 2024 Playoffs : आतापर्यंत पाच संघाचं भवितव्य स्पष्ट झालेय. यामधील दोन संघाने प्लेऑपमध्ये प्रवेश मिळवला तर तीन संघाचं आव्हान संपुष्टात आलेय.

IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं समीकरण बदलत आहे. आतापर्यंत पाच संघाचं भवितव्य स्पष्ट झालेय. यामधील दोन संघाने प्लेऑपमध्ये प्रवेश मिळवला तर तीन संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी टॉप 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलेय. तर मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांचा गाशा गुंडाळला आहे. आता दोन जागांसाठी पाच संघामध्ये चुरस सुरु आहे. यामध्ये तीन संघाला जास्त संधी आहे.  चार दिवसांमध्ये पाच सामने होणार आहेत. या पाच सामन्यामधून दोन संघाची निवड होणार आहे.  प्लेऑपमध्ये कोणते संघ जाणार.. याबाबत एकस्पर्ट अन् चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. 

प्लेऑफसाठी फक्त दोन जागा - 

कोलकाताने 19 तर राजस्थानने 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं स्थान आता निश्चित झालेय. आता फक्त दोन जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी, दिल्ली आणि लखनौ या संघामध्ये चुरस आहे. यामध्ये दिल्ली आणि लखनौ यांचं स्पर्धेतील आव्हान रामभरोसेच आहे. त्यामुळे दोन जागांसाठी खरी लढत तीन संघामध्येच होणार आहे. पण स्पर्धेतील आव्हान संपलेले संघ अनेकांची पार्टी खराब कुरु शकतात. 

 हैदराबादला फक्त एका विजयाची गरज -

हैदरदाबाच्या नावावर सध्या 14 गुणांची नोंद आहे. त्यांचे दोन सामने अद्याप शिल्लक आहेत. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्याविरोधात हैदराबादचा सामना रंगणार आहे. या दोन्हीपैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास हैदराबादचं प्लेऑफचं तिकिट निश्चित होणार आहे. जर हैदराबादने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचं टॉप 2 मधील स्थान निश्चित होऊ शकतं. पण दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना केल्यास आव्हान संपुष्टात येऊ शकतं. 

CSK साठी काय समीकरण -

18 मे रोजी चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये आमना-सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवल्यास त्यांना प्लेऑफचं तिकिट मिळणार आहे. त्यांचा रनरेटही चांगलाय. चेन्नईच्या नावावर सध्या 13 सामन्यात 14 गुण आहेत. एक सामना जिंकताच 16 गुण होतील.  

आरसीबीचं प्लेऑफचं समीकरण कसं असेल ? 

आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.  चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. 

चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. 

दिल्ली अन् लखनौची संधी काय ?

दिल्लीने अखेरच्या सामन्यात लखनौचा पराभव करत 14 गुणांपर्यंत मजल मारली. पण त्यांचा रनरेट अतिशय खराब आहे. दिल्लीच्या नावावर 14 सामन्यात 14 गुण आहेत. त्यांचा रनरेट -0.377 इतका आहे. दिल्लीचा चौथ्या क्रमांकावर पोहचणं कठीण आहे, पण अशक्य नाही. चौथ्या क्रमांकावर पोहचण्यासाठी दिल्लीला रामभरोसे राहावं लागणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा संघ पंजाब आणि गुजरातविरोधात 100-100 धावांच्या फरकाने सामना गमावेल. तर त्यांचा रनरेट घसरेल. असं झालं तरच हैदराबादचा रनरेट दिल्लीपेक्षा कमी होईल. त्यावेळीच दिल्लीला संधी मिळणार नाही. हैदराबाद संघाचा फॉर्म पाहाता दिल्लीला प्लेऑपमध्ये पोहचण्याची संधी मिळणं शक्य दिसत नाही. पण क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही.

लखनौचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीकडून पराभव झाल्यामुळे त्यांच्यावरही बाहेर जाण्याचं संकट आहे. अखेरचा सामना जिंकला तरी त्यांना इतरांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. दिल्ली आणि लखनौचं आव्हान जवळपास संपुष्टातच आलेय. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget