PBKS vs GT Live Score IPL 2024 :पंजाबच्या पराभवाची मालिका सुरुच, गुजरातचा अखेरच्या ओव्हरमध्ये विजय
PBKS vs GT Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 37 वी मॅच आहे.
गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जवर तीन विकेटनं विजय मिळवला आहे. पंजाब किंग्जचा होम ग्राऊंडवर चौथा पराभव झाला.
गुजरातला पाचवा धक्का बसला असून उमरजई 13 धावा करुन बाद झाला.
साई सुदर्शन 31 धावांवर बाद झाला आहे. सॅम करननं गुजरातला चौथा धक्का दिला.
शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर लागोपाठ बाद झाले आहेत. शुभमन गिलनं 35 तर डेव्हिड मिलरनं 4 धावा केल्या.
अर्शदीप सिंगनं गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला आहे. रिद्धिमान साहा आजदेखील चांगली खेळी करु शकला नाही. त्यानं 13 धावा केल्या.
पंजाबच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 120 धावा करता आल्या आहेत. पंजाब किंग्जच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. प्रभासिमरन सिंगनं 35 तर हरप्रीत ब्रारनं 29 धावा केल्या.
पंजाब किंग्जला आठवा धक्का बसला आहे. ब्रार 29 धावा करुन बाद झाला. ब्रारनं 12 बॉलमध्ये 29 धावा केल्या, त्याला आर. साईकिशोरनं बाद केलं.
आशुतोष शर्मा आज चांगली धावसंख्या करु शकला नाही. तो 3 धावा करुन बाद झाला. आर. साई किशोरनं त्याला बाद केलं.
जितेश शर्मा केवळ 13 धावा करुन बाद झाला आहे.
पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन 6 धावा करुन बाद झाला आहे.
राशिद खाननं पंजाब किंग्जचा कॅप्टन सॅम करनला 20 धावांवर बाद केलं.
पंजाब किंग्जला दुसरा धक्का बसला असून राईली रुसो 9 धावांवर बाद झाला आहे.
पंजाब किंग्जला पहिला धक्का बसलेला आहे. पंजाब किंग्जचा सलामीवर प्रभासिमरनसिंह 35 धावांवर बाद झाला आहे.
पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातचा संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 89 धावांवर बाद झाला होता. तो पराभव विसरुन गुजरात आज पंजाब विरुद्ध मैदानात उतरेल.
गुजरात टायटन्ससाठी यंदाचं आयपीएल देखील निराशाजनक राहिलं आहे. सातपैकी चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. ते आठव्या स्थानावर आहेत.
पंजाब किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये देखील निराशाजनक कामगिरी केली आहे. 7 पैकी 5 मॅचमध्ये पराभव झाल्यानं ते चार गुणांसह नवव्या स्थानावर आहेत.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आतापर्यंत चार वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी दोन मॅच गुजरातनं तर दोन मॅच पंजाबनं जिंकल्या आहेत.
पंजाब किंग्जची टीम महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील अखेरची मॅच असेल. या स्टेडियमवर झालेल्या चारपैकी केवळ एका मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे.
पार्श्वभूमी
PBKS vs GT Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. पंजाबच्या टीमनं सात पैकी केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर त्यांना पाच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे गुजरातनं 7 मॅच खेळल्या आहेत त्यापैकी तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. पंजाब 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर गुजरात 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -