चंदीगड : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) काल झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings ) ला 9 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 192 धावा केल्या होत्या. पंजाबनं या धावसंख्येचा पाठलाग करताना 183 धावांपर्यंत मजल मारली. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांच्या दोघांच्या दमदार खेळीमुळं मॅच मुंबईच्या हातून जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. पंजाबचा संघ 183 धावांवर बाद झाल्यानं मुंबईला यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळाला. मुंबई इंडियन्सला तिसरा विजय मिळाला असला तरी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya Fined)  मात्र झटका बसला आहे. पंजाब विरुद्धच्या मॅचमधील स्लो ओव्हर रेट प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


हार्दिक पांड्याला 12 लाखांचा दंड


मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यायाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब विरुद्ध बॉलिंग करताना मुंबईनं ओव्हर रेट सांभाळता आला नाही त्यामुळं ही कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या नियमानुसार स्लो ओव्हर रेटसाठी हार्दिक पांड्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेट प्रकरणी हार्दिक पांड्यावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.    


आशुतोषची वादळी खेळी मात्र पंजाबचा पराभव


मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 बाद 192 धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या 78 धावांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवला सॅम कर्रननं बाद केल्यानंतर टीम डेव्हिड आणि तिलक वर्माच्या यांच्या बॅटिंगमुळं मुंबईनं 192 धावांचा टप्पा गाठला. पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पंजाबकडून शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली. शशांक सिंहनं 41 तर आशुतोष शर्मानं  61 धावा  केल्या. मात्र, पंजाबला तो विजय मिळवून देऊ शकला नाही.    


मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत तीन मॅच जिंकल्या असून गुणतालिकेत ते आता सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्याविरुद्ध विजय मिळवला. तर, त्यांना चार मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.


दरम्यान, मुंबई इंडियन्सची पुढील मॅच राजस्थान रॉयल्स विरुद्ध 22 एप्रिल रोजी होणार आहे.  मुंबई इंडियन्सनं विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार का ते पाहावं लागेल.  गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईची मॅच जयपूरमध्ये होणार आहे. 


संबंधित बातम्या :


Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video


CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI