Chennai Super Kings vs Lucknow Super Giants IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौमधील एकाना मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 


आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई 6 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 6 सामने खेळले असून यामध्ये चार सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव झाला आहे. तर लखनौनेही आतापर्यंत 6 सामने खेळून 6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनौने 3 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  दोन्ही संघ पुढील सामना जिंकून आणखी दोन गुण मिळविण्याचा प्रयत्न करतील.


खेळपट्टी कशी असेल?


लखनौमध्ये जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याला फायदा होईल. यामुळेच केएल संघाने आतापर्यंत तीनदा नाणेफेक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. लखनौच्या खेळपट्टीवर गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. मात्र, फलंदाजांनी सावध खेळ केल्यास धावाही होऊ शकतात. पण इथेच फिरकीपटू आपला प्रभाव पाडतात.  ज्या संघाच्या फिरकीपटूंनी येथे चांगली कामगिरी केली, त्याच्या विजयाची शक्यता जास्त आहे.


चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing XI:


रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड(c), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी(w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान


लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI:


क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर


चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ: 


रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड(c), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी(w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, एन. मोईन अली, मिचेल सँटनर, शेख रशीद, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन, दीपक चहर


लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ: 


क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौथम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीर सिंग चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी