IPL 2024 MI vs LSG: आज मुंबई इंडियन्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा होणार सामना; विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ इच्छुक

IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: मुंबई आणि लखनौचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दोन्ही संघ सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. 

मुकेश चव्हाण Last Updated: 18 May 2024 12:16 AM
मुंबईची 196 धावांपर्यंत मजल

मुंबईची 196 धावांपर्यंत मजल, लखनौचा 18 धावांनी विजय

ईशान किशन बाद

ईशान किशन बाद... 14 चेंडूत 14 धावा... 

नमन धीरचे शानदर अर्धशतक

नमन धीरचे शानदर अर्धशतक... मोक्याच्या क्षणी 24 चेंडूत ठोकले अर्धशतक

मुंबईला चौथा धक्का

हार्दिक पांड्याच्या रुपाने मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या 16 धावा काढून बाद  

रोहित बाद

मुंबईला तिसरा धक्का.. रोहित शर्मा 68 धावांवर बाद... बिश्नोईनं पाठवले तंबूत... मुंबई तीन बाद 97 धावा

मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमार यादव गोल्डन डकचा शिकार... मुंबईला दुसरा धक्का

मुंबईला पहिला धक्का

डेवाल्ड ब्रेविसच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला आहे. ब्रेविस 23 धावा काढून बाद झाला. रोहित शर्मा 61 धावांवर खेळत आहे. मुंबई 8.4 षटकानंतर एक बाद 88 धावा

रोहित शर्माची आक्रमक सुरुवात

रोहित शर्मानं लखनौविरोधात आक्रमक सुरुवात केली आहे. रोहित शर्मा 12 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे. मुंभई 2.4 षटकानंतर बिनबाद 24 धावा

लखनौची 214 धावांपर्यंत मजल

लखनौची 214 धावांपर्यंत मजल.. मुंबईला 215 धावांचे आव्हान

लखनौला लागोपाठ तीन धक्के

केएल राहुल 55, निकोलस पूरन 75 आणि अर्शद खान 0 धावांवर तंबूत परतला. लखनौचे तीन फलंदाज एकामागोमाग तंबूत परतले. 

लखनौची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

निकोलस पूरन आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर लखनौनं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. 15 षटकानंतर लखनौ 3 बाद 159 धावा

मुंबईने नाणेफेक जिंकली

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

राहुलची टीम जिंकल्यास प्लेऑफचं समीकरण कसं असणार?

लखनौ सामन्यासाठी सज्ज

लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ:

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, काइल मेयर्स, शमर जोसेफ, ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, मयंक यादव

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-

रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.

पार्श्वभूमी

IPL 2024 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: आज मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामान होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबई आणि लखनौचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दोन्ही संघ सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.