Mohammed Shami Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे भारतीय क्रिकेट संघाचे असे गोलंदाज आहेत, ज्यांच्या कामगिरीवर संघाचा विजय जवळपास अवलंबून असतो. मात्र दुखापतींमुळे हे दोन्ही वेगवान गोलंदाज संघासाठी चिंतेचे कारण बनले आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर शमीही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा स्थितीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये या दोन्ही गोलंदाजांच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे.


मोहम्मद शमीने 2024 मध्ये रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, परंतु त्याच्या गुडघ्याच्या समस्येमुळे तो पुन्हा बाहेर पडला. त्यामुळेच त्याला बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले नाही आणि विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही तो खेळू शकला नाही.   


मोहम्मद शमीबद्दल असे वृत्त होते की, तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दावा करू शकतो, परंतु तज्ञांचे मत आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याने मैदानात परत येऊ नये. त्याच्या घाईघाईने परतल्यामुळे दुखापतीची समस्या आणखी वाढू शकते, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.


बुमराह-शमीच्या दुखापतींमुळे भारताचे स्वप्न पुन्हा भंगणार?


जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असेल. मात्र, बीसीसीआयने या दोन खेळाडूंना परत आणण्याची घाई करू नये. ते पूर्णपणे तंदुरुस्त होण्याआधी त्यांना खेळण्यास भाग पाडणे संघासाठी धोका ठरू शकते.


हे ही वाचा -


WTC Final 2025 : ...जर ऑस्ट्रेलियाने 'ही' चूक पुन्हा केली तर पडणार महागात; WTC फायनलमधून होणार बाहेर? जाणून घ्या समीकरण