मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात  20 वी मॅच सुरु आहे. दिल्लीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी केली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 80 धावांची सलामीची भागिदारी केली. मात्र, यानंतर नियमित अंतरानं मुंबईच्या विकेट पड गेल्या. रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. अक्षर पटेलनं रोहित शर्मा आणि इशान किशन यांना बाद केलं. मुंबई इंडियन्सकडून  रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, टीम डेविड आणि रोमारियो शेफर्डनं जोरदार फटकेबाजी केली. शेफर्डच्या 39 धावांच्या जोरावर मुंबईनं 20 ओव्हर्समध्ये 5 विकेटवर 234 धावा केल्या. 


रोहित शर्मा आणि इशान किशनची चांगली सुरुवात..


रोहित शर्मा आणि इशान किशननं यांनी मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली होती. पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या बिनबाद 75 धावा झाल्या होत्या. रोहित शर्मानं आजच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली.  सातव्या ओव्हरमध्ये रिषभ पंतनं अक्षर पटेलकडे बॉलिंग देण्याचा निर्णय घेतला. अक्षर पटेलनं कॅप्टननं दिलेल्या संधीचं सोनं केलं. अक्षर पटेलनं सातव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्मा 49 धावा करुन बाद झाला. दुखापतीनंतर कमबॅक करणारा सूर्यकुमार यादव देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. त्याला नॉर्खियानं बाद केलं. अक्षर पटेलनं मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का देत इशान किशनला 11 व्या ओव्हरमध्ये बाद केलं. इशान किशन 42 धावांवर बाद केलं. 


मुंबईची चांगली सुरुवात पण नियमित धक्के


मुंबई इंडियन्सनं चांगली सुरुवात केली होती. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा लागोपाठ बाद झाल्यानं मुंबईला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईचा डाव कर्णधार हार्दिक पांड्या आणि टीम डेविडनं सावरला.  हार्दिक पांड्यानं  39 धावा केल्या.  टिम डेव्हिडनं 45 तर शेफर्डनं 39 धावा केल्या. 


मुंबई पहिला विजय मिळवणार?


यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात सलग तीन पराभवांनी झालेली आहे.  मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं.आजच्या मॅचमध्ये तरी मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळणार का हे पाहावं लागेल.


दिल्ली कॅपिटल्स कमबॅक करणार?


दिल्ली कॅपिटल्सच्या आतापर्यंत चार मॅच झालेल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. त्यांना इतर तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.  


संबंधित बातम्या : 


MI फायनल खेळणार का? हार्दिकच्या नेतृत्वात टीमचं वातावरण बिघडलेय का? मुंबईच्या खेळाडूनं स्पष्ट शब्दात दिलं उत्तर


CSK च्या चाहत्यासोबत स्टेडियमध्ये झाला फ्रॉड, 4500 रुपयांचं तिकिट घेऊन गेला अन्...