मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएलची 20 वी मॅच होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत (Rishabh Pant) यानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या बॉलर्सना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये  यश मिळालं नाही. रोहित शर्मा आणि इशान किशननं मुंबई इंडियन्सला चांगली सुरवात करुन दिली.आजच्या मॅचमध्ये मुंबईच्या टीममध्ये मिस्टर 360 अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) कमबॅक झालं. रोहित शर्मा आणि इशान किशननं मुंबईला पहिल्या सहा ओव्हर्समध्ये 75 धावांपर्यंत पोहोचवलं. रोहित शर्मा सातव्या ओव्हरच्या अखरेच्या बॉलवर बाद झाला, त्यानं 49 धावा केल्या. रोहित शर्मानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करु शकला नाही. 


सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद


आयपीएलच्या पहिल्या तीन मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात टायटन्स,  सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा पराभव झाला होता. या तीन मॅचेसमध्ये मुंबईला सूर्यकुमार यादवची कमी जाणवत होती. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं गेल्या चार महिन्यांपासून दूर होता. अखेर सूर्यकुमार यादव फिट झाल्यानंतर त्याला मुंबईच्या टीममध्ये त्याला संधी देण्यात आली होती. रोहित शर्मा आणि इशान किशननं 80 धावांची सलामीची भागिदारी केली. रोहित शर्माला अक्षर पटेलनं बाद केलं. अक्षर पटेलनं रोहित शर्माला 49 धावावंर बाद केल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात फलंदाजीसाठी उतरला. 


रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकमार यादव फलंदाजीसाठी आला.  तब्बल चार महिन्यानंतर पुनरागमन करणारा सूर्यकुमार यादव मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र, सूर्यकुमार यादव नॉर्खियाला मोठा फटका मारताना बाद झाला.  


अक्षर पटेलनं मुंबईला रोखलं


मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करुन देणाऱ्या रोहित शर्मा आणि इशान किशनला अक्षर पटेलनं बाद केलं. मुंबई इंडियन्सनं पहिल्या सहा ओव्हर्समध्ये बिनबाद 75 धावा केल्या होत्या. सातव्या ओव्हर्सच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्माला अक्षर पटेलनं बोल्ड केलं. यानंतर अकराव्या ओव्हरमध्ये इशान किशनला देखील अक्षर पटेलनं बाद केलं. रोहित शर्मानं 49 तर इशान किशननं 42 धावा केल्या.  रोहित शर्मा आणि इशान किशन बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावांचा वेग कमी झाला. तिलक वर्मा देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. त्यानं 5 बॉलमध्ये 6 धावा केल्या. दिल्लीनं मुंबईला चार धक्के देत मॅचमध्ये कमबॅक केलं.


संबंधित बातम्या : 


MI फायनल खेळणार का? हार्दिकच्या नेतृत्वात टीमचं वातावरण बिघडलेय का? मुंबईच्या खेळाडूनं स्पष्ट शब्दात दिलं उत्तर


CSK च्या चाहत्यासोबत स्टेडियमध्ये झाला फ्रॉड, 4500 रुपयांचं तिकिट घेऊन गेला अन्...